एल अँड टी डिफेन्स मध्ये समर्थ पॉलिटेक्निक च्या ३८ विद्यार्थ्यांची निवड

1 min read

बेल्हे दि.२८:- समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित,समर्थ पॉलिटेक्निक, बेल्हे (बांगरवाडी) येथील ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाच्या वतीने नुकत्याच आयोजित केलेल्या “पूल कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह २०२५” अंतर्गत इलेक्ट्रॉनिक्स

अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग व मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विभागातील ३८ विद्यार्थ्यांची एल अँड टी (पुणे) या नामांकित कंपनीमध्ये निवड झाल्याची माहिती प्राचार्य अनिल कपिले यांनी दिली.या पूल कॅम्पस ड्राइव्ह मध्ये जुन्नर, आंबेगाव, अकोले व संगमनेर तालुक्यातील २०० विद्यार्थ्यांनी उस्फुर्त सहभाग नोंदवला.समर्थ संकुलातील निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी पुढीलप्रमाणे :मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातून आदिनाथ शिंदे, ज्ञानेश्वर थोरात, संदेश गावडे, कार्तिक राऊत, शुभम वाघ, प्रसाद कुटे, करण विधाटे, यश काकडे, संदेश तांबे, किरण धोत्रे,

सागर घोगरे, वैभव चिखले, यश खिल्लारी, शिवम ढोले, पुनम कोटकर, अक्षय वाकचौरे, हर्षद कानवडे, तसेच इलेक्ट्रोनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागातून कुणाल हिंगे,संस्कार गाडे, आयुष ढोमसे, ओम हांडे, ओमकार भोर, मोहित सूर्यवंशी, धीरज कवडे, वरद कवडे, सार्थक पोखरकर, ऋषिकेश टेमगिरे, अशीती मालुंजकर, विजय कोल्हे, वैष्णवी कानवडे, संस्कृती चित्यळ, हर्षदा जोशी, श्रावणी जाधव या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आल्याची माहिती समर्थ पॉलिटेक्निकचे प्राचार्य अनिल कपिले सर यांनी दिली.भक्ती ढमाले, निलय खानापूरकर, हर्षद औटी, यश शहीद, वेदांत खैरनार हे विद्यार्थी प्रतीक्षा यादी मध्ये आहेत.सदर निवड प्रक्रिया विलास पवार (एच आर मॅनेजर), श्रीजीत श्री कुमार (ए जी एम इलेक्ट्रॉनिक्स),

नवीन गुप्ता (ए जी एम इलेक्ट्रॉनिक्स), गोरक्षनाथ औटी (डी जी एम मेकॅनिकल), पांडुरंग मुळीक (असिस्टंट मॅनेजर मेकॅनिकल) व प्रमोद पाटील (ट्रेनि एच आर) यांनी पूर्ण केली.सदर प्लेसमेंट साठी टेक्निकल डायरेक्टर डॉ.चंद्रशेखर घुले, ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी प्रा.संकेत विघे, शैक्षणिक समन्वयक प्रा.संजय कंधारे, मेकॅनिकल इंजिनियरिंग विभागाचे प्रा.प्रमुख महेंद्र खटाटे, इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग विभागाचे प्रमुख प्रा.आशिष झाडोकर, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन्स विभागप्रमुख प्रा.आदिनाथ सातपुते, मेकॅट्रॉनिक्स विभागप्रमुख प्रा.श्याम फुलपगारे, कॉम्प्युटर विभागप्रमुख प्रा.स्वप्निल नवले, प्रा.हुसेन मोमीन, प्रा.माधवी भोर, प्रा.प्रणाली थोरात, प्रा.प्रकाश डावखर आदींनी परिश्रम घेतले. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष वसंत शेळके, उपाध्यक्ष माऊली शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहल शेळके, कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत तसेच संकुलातील सर्व प्राचार्य, विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे