शिक्रापूरचे बेशिस्त पोलीस हवालदार निलंबित

1 min read

शिक्रापूर दि.२४:-शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन येथे कर्तव्यावर – असलेले पोलीस हवालदार गजानन नारायण खत्री हे कर्तव्यावर सतत गैरहजर राहुन त्यांच्या कडे सोपवलेल्या गुन्ह्यांचा तपास प्रलंबित ठेवत असल्याचा तसेच गैरवर्तन करत असल्याचा ठपका ठेवत पोलीस हवलदार गजानन खत्री यांचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी निलंबन केले असून त्याबाबतचे पत्र देखील दिले आहे.शिक्रापूर ता. शिरुर येथील पोलीस हवालदार गजानन खत्री यांच्याबाबतचा चौकशी अहवाल पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी मागविला.खत्री कर्तव्यावर वारंवार गैरहजर असल्याचे तसेच उपमुख्यमंत्री यांच्या दौऱ्यावेळी हेलिपॅड बाहेर तसेच तहसील कार्यालय येथे बंदोबस्तासाठी नेमलेले असताना देखील गैरहजर असल्याचे दिसून आले. तसेच यापूर्वी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी बोलावले असता उद्धट वर्तन केल्याचे उघड झाल्याने पोलीस हवालदार गजानन खत्री यांच्यावर कारवाई करण्यात आली. बेशिस्त, बेजबाबदार तसेच गैरवर्तन केल्याचे ग्राह्य ठरवत पोलीस हवलदार गजानन खत्री यांचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी काही नियमांच्या अधीन शासकीय सेवेतून निलंबन केले. त्याबाबतचे पत्र जारी करत गजानन खत्री यांना पोलीस मुख्यालय येथील राखीव पोलीस निरीक्षक यांच्याकडे नियमानुसार दिवसातून दोन वेळा हजेरी लावण्याचेदेखील आदेश देण्यात आले आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे