नागपुरात २ हजार ४५८ पाकिस्तानी तर राज्यात ५०२३
1 min read
मुंबई दि.२७:- अमित शहा यांच्या आदेशानंतर महाराष्ट्रात संपूर्ण पोलीस यंत्रणा कामाला लागली होती. राज्यातल्या ४८ शहरांत एकूण ५०२३ पाकिस्तानी नागरिक आढळले आहेत, अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी एका वाहिनीशी बोलताना दिली. नागपूर शहरात सर्वाधिक २ हजार ४५८ पाकिस्तानी आढळले असून. ठाणे शहरात ११०६ पाकिस्तानी नागरिक सापडले आहेत. तर मुंबईत १४ पाकिस्तानी नागरिक राहात असल्याची माहिती समोर आली आहे. यामधील फक्त ५१ पाकिस्तान्यांकडे वैध कागदपत्रं मिळाली आहेत.
धक्कादायक म्हणजे, महाराष्ट्रात आलेले १०७ पाकिस्तानी नागरिक बेपत्ता झाल्याचे आढळून आले आहे. १०७ पाकिस्तान्यांचा पोलीस वा अन्य संस्थांना पत्ताच लागत नसल्याचेही उघड झाले आहे.