ताडी पिऊन तरुणाचा मृत्यू, गावातील महिला आक्रमक; महिलांनी ताडी, दारूची दुकाने फोडली

1 min read

भोर दि.२७:- ताडी पिऊन अंगसुळे (ता. भोर)गावातील तरुण मृत्युमुखी पडला. यामुळे गावातील महिला एकत्र येऊन घोषणा देत अवैध दारू विक्री व ताडी विक्री करणारी दुकाने फोडून बनावट ताडीची केंद्र व दारूच्या बाटल्या फोडल्या, टपरीपुढील पत्राशेड पाडले. पोलिसांना अर्ज देऊनही कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नसून. गावातील ताडी व दारू विक्री बंद केली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.यावेळी गावातील सुषमा राऊत, वंदना राऊत, नंदा शेडगे, रंजना राऊत, सुभद्रा राऊत वैशाली राऊत संजना दळवी, कुंदा राऊत, मंगल राऊत, सुमन राऊत, शांताबाई राऊत, सुमन राऊत, सुषमा तावरे, सोपान राऊत, धोंडिबा राऊत, आनंद राऊत, शिवाजी कंक, यशवंत कंक, बबन भगत, विठ्ठल सणस, अक्षय झुनगारे, भाऊसाहेब परखांदे, शशीकांत किरवे, रामचंद्र राऊत, मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.विजय मारुती शेडगे (२४, रा. अंगसुळे, ता. भोर) हा ताडी पिऊन मृत्युमुखी पडल्याची घटना घडली. महिला आक्रमक होऊन ताडी व दारू विकणाऱ्यांच्या घरात घुसून अवैध ताडी व देशी विदेशी दारूच्या बाटल्या फोडल्या आणि निषेध व्यक्त केला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे