सह्याद्री व्हॅलीत विद्यार्थ्यांच्या कॅम्पस मुलाखती
1 min read
राजुरी दि.२७:- महारिया चॅरिटेबल ट्रस्ट संचालित सह्याद्री व्हॅली कॉलेज ऑफ इंजिनीरिंग अँड टेकनॉलॉजीस राजुरी या महाविद्यालयात,
शनिवार दि.२६ एप्रिल रोजी रांजणगाव (पुणे) येथील मल्टीनॅशनल कंपनी मदरसन ऑटोमोटिव्ह टेकनॉलॉजी आणि इंजिनीरिंग या कंपनीस विद्यालयाच्या वतीने आमंत्रीत करून
विद्यार्थी च्या उज्ज्वल भविष्यासाठी कॉलेज मधील गुणवंत विद्यार्थी साठी कॅम्पस मुलाखती घेण्यात आल्या. त्यामध्ये आय. टी.आय व डिप्लोमा च्या ४० विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या.
मुलाखती घेण्याकरीता मदरसन कंपनी चे सिनिअर H. R संतोष चौधरी तसेंच टीम ने मुलाखती घेतल्या,
तसेच नियोजन प्रा.मुरलीधर कुरकुटे,प्रा. सचिन आभाळे, प्रा. निचित यांनी केले. तसेंच संस्थेचे खजिनदार सचिन चव्हाण यांनी HR व टीम चा सत्कार सन्मान केला.आणि संस्थेचे उप प्राचार्य पी. बालारामडू यांनी कंपनी व टीम चे व डायरेक्टर यांचे आभार व्यक्त केले.