सरदार पटेल हायस्कूलला मिळाले सहा एलईडी संच
1 min read
आणे दि.२५:- सह्याद्री इंडस्ट्रीज लिमिटेड पुणे यांच्या CSR फंडातून तसेच रोटरी क्लब ऑफ पुणे फार ईस्ट यांच्या व्यवस्थापनाने सरदार पटेल हायस्कूल आणे (ता.जुन्नर) येथे गेल्या दोन वर्षांत सहा एलईडी संच बसविण्यात आले असल्याची माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक धोंडिभाऊ शिंदे यांनी दिली. 23 एप्रिल रोजी रोटेरियन पंकजजी पटेल व रो.मेहुल चिमठाणकर यांच्या शुभहस्ते उदघाटन संपन्न झाले. या प्रसंगी रो. सुहास नांगरे,जेष्ठ अध्यापक रविंद्र जाधव, संदिप धराडे, विजय भणगे, सुरेश कदम, संगिता कदम, सपना पन्हाळे, अतुल बारवकर, शाकिर इनामदार, अक्षय राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.
पंकज पटेल यांनी विद्यालयातील मुला-मुलींशी संवाद साधताना यापुढील काळात शाळेला लागणारे डिजिटल साधने उपलब्ध करून दिली जातील. इ.10वी परीक्षेत प्रथम तीन क्रमांक मिळविणाऱ्या यशस्वी मुलींसाठी बक्षीसे जाहीर करण्यात आली.
शालेय परिसरात मोठ्या प्रमाणावर देशी जातीच्या झाडांचे वृक्षारोपण करून त्यांची जोपासना करण्याचे आवाहन केले जेणेकरून शाळेचं हे माळरान बहरले जाईल. उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी धोंडिभाऊ शिंदे हे होते तर सुत्रसंचालन तुषार आहेर यांनी केले. रविंद्र जाधव यांनी आभार मानले.