कुकडी पाटबंधारे विभाग क्र.1, जल व्यवस्थापन कृती पंधरवड्याचा आमदार शरद सोनवणे यांच्या शुभहस्ते शुभारंभ
1 min readनारायणगाव दि.१६:- जल व्यवस्थापन कृती पंधरवाडा २०२५ दि. १५ एप्रिल ते ३० एप्रिल २०२५ या दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे. त्याचा कुकडी प्रकल्प वसाहतीमधील विश्रामगृह या ठिकाणी सदर कार्यक्रमाचा शुभारंभ जुन्नर तालुक्याचे आमदार शरद सोनवणे व प्रशांत कडूसकर (कार्यकारी अभियंता, कुकडी पाटबंधारे विभाग क्र.1),
नारायणगाव व उपविभागीय अधिकारी, कुकडी पाटबंधारे उपविभाग क्र.1 व नारायणगाव रविंद्र हांडे व सर्व शाखाधिकारी, सर्व कर्मचारी वर्ग व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करून मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.
प्रास्ताविक भुषण भोरटक्के, शाखाधिकारी यांनी केले व त्या नंतर मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले व शेवटी जलप्रतिज्ञा झाली. अशा प्रकारे या गोड कार्यक्रमाचा शुभारंभ झाला.
