सह्याद्री व्हॅलीच्या विद्यार्थ्यांचे रक्तदान शिबिर

1 min read

राजुरी दि.१७:- महारिया चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सह्याद्री व्हॅली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी या महाविद्यालयात बुधवार दि.१६ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबीर पूना ब्लड सेंटर नारायणगाव यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन संस्थेचे खजिनदार सचिन चव्हाण यांचे हस्ते करण्यात आले. शिबिरात एकूण ६५ ब्लड बॅग चे संकलन करण्यात आले.महाविद्यालयाचे प्राचार्य पी. बालारामडू यांनी रक्तदानाचे महत्व सांगून जास्तीत जास्त विद्यार्थांना रक्तदान करण्याचे आवाहन केले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग होता. प्राध्यापक वैभव नांगरे यांनी ह्या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात साठी विशेष सहकार्य केले. महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये यावर्षी पहिल्यांदाच या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. व दरवर्षी असे रक्तदान शिबिर आयोजित करणार असल्याचे यावेळी विद्यार्थी, प्राध्यापकांनी सांगितले. यामध्ये प्राध्यापक, विद्यार्थी व विद्यार्थिनींनी रक्तदान केले. रक्तदान करणाऱ्यांना संस्थेचे खजिनदार सचिन चव्हाण तसेच प्राचार्य पी. बालारामडू यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे