इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन आळेफाटा विभाग यांचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न
1 min read
आळेफाटा दि.१९:-इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन आळेफाटा ग्रामीण विभाग (स्थापना:५ जाने.२०२३) अंतर्गत जानेवारी ते मार्च 2025 दरम्यान विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये कबड्डी, खो-खो, हॉलीबॉल, थ्रोबॉल, क्रिकेट व बॅडमिंटन आदी खेळांचा तसेच पोस्टर प्रदर्शन, फार्मा मॉडेल मेकिंग, प्रश्नमजुषा, ADR रिपोर्टिंग आणि मॉनिटरिंग आदी स्पर्धा विविध सहभागी महाविद्यालयांमध्ये आयोजित करण्यात आल्या होत्या.या स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ विशाल जुन्नर फार्मसी महाविद्यालय, आळे यांच्या प्रतिभा स्मृती सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून हणमंत गायकवाड क्वालिटी आणि गुणवत्ता विभाग प्रमुख, प्रीमियम सिरम आणि व्हॅक्सिन प्रायव्हेट लिमिटेड.नारायणगाव, महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी गणपत टेमकर, डायरेक्टर पशुसेवा औषधालय विभाग, डॉ. डी एस गल्हे मुख्य कार्यकारी अधिकारी,
जयहिंद शैक्षणिक संकुल, इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन आळेफाटा विभागाचे अध्यक्ष डॉ. डी डी गायकवाड, उपाध्यक्ष डॉ. बी सी हातपक्की, सर्व पदाधिकारी डॉ एस डी घुले, प्राचार्य-समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी बेल्हे, डॉ. बाहेती सर, प्राचार्य-सीताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी ( बी फार्मसी) शिरूर,
डॉ. अमोल शहा , प्राचार्य-सीताबाई थिटे इन्स्टिट्यूट फार्मसी ( डी फार्म) डॉ. रामटेके सर, प्राचार्य – इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी बेल्हे, डॉ. रूपाली हांडे, प्राचार्या- इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी आळे, डॉ. लीना पाठक, प्राचार्या- जयहिंद कॉलेज ऑफ फार्मसी कुरण, डॉ. ए एस देशमुख- प्राचार्य, श्री स्वामी समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी माळवाडी,
डॉ. सचिन नागदेवे, प्राचार्य- शिवनेरी कॉलेज ऑफ फार्मसी खानापूर, डॉ. अनुराधा ताजवे प्राचार्या- इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी फॉर वुमेन, आळे, सहभागी महाविद्यालयांचे शिक्षक आदी मान्यवर उपस्थित होते.मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात झाली. उपस्थित सर्व मान्यवरांचे सत्कार करून स्वागत करण्यात आले.
डॉ. बाहेती सर, गणपत टेमकर, डॉ. गल्हे सर व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे हणमंत गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना सध्याच्या स्पर्धेच्या युगात आपलं यशस्वी करिअर कस घडवता येईल याविषयी मार्गदर्शन केलं व शुभेच्छा दिल्या. मान्यवरांच्या हस्ते विजयी व उपविजयी विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.
याठिकाणी सहभागी विद्यार्थी प्रतिनिधीने आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धांविषयी आपले अनुभव व्यक्त केले. या बक्षीस वितरण कार्यक्रमादरम्यान डॉ. सचिन नागदेवे सर यांनी आपल्या मनोरंजन कौशल्याने कार्यक्रमाची शोभा वाढवली.
हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी महाविद्यालयाच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य केले. डॉ. अनुराधा ताजवे यांनी आपल्या आकर्षक निवेदन शैलीने कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले व सभागृहाचे आभार व्यक्त केले.