जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांना दिवसा थ्री फेज वीज शेतीसाठी मिळावी अन्यथा तीव्र आंदोलन:- प्रमोद खांडगे पाटील
1 min read
जुन्नर दि.१८:- सोमवार ते गुरुवार सकाळी (५.०० ते ११.३०)३ फेज राहील आणि शुक्रवार ते रविवार दुपारी (११.३० ते ६.००) असा टाईम केला आहे. म्हणजेच दिवसा ३ फेज फक्त ३ दिवस भेटेल याला स्वाभीमानी शेतकरी संघटनेचा शेतकऱ्यांचा तिव्र विरोध आहे.आठवड्याचे वेळापत्रक देखील शेतकऱ्यांना दिले जात नाही महावितरण कंपनीचा जुन्नर तालुक्यामध्ये मोठा सावळा गोंधळ चालू आहे.त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.हे सर्व सुरळीत तात्काळ करावे. अशा स्वरूपाचे निवेदन सुनील डोंगरे उपकार्यकारी अभियंता नारायणगावयांना दिले आहे.
शेतीसाठी ३ फेज वीज पूर्ण न मिळाल्यास शेतीचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे जुन्नर तालुक्यातील शेतीसाठी सोमवार ते रविवार दिवस सकाळी १०.०० ते ६.०० थ्री फेज लाईट दिवसा मिळालीच पाहिजे.अशा पद्धतीत शेतीसाठी वीज मिळाली नाही तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.
तसेच गुरुवारी या दिवशी पूर्ण दिवस थ्री फेज वीज नसते इतर दिवशी देखील फुल दाबाने वीज मिळत नाही.वीज डीम होत असते.त्यामुळे शेतकऱ्यांचे शेती पंप जळत आहेत. शासनाने/महावितरण कंपनीने दिवसा थ्री फेज वीज दिली नाही.
तर तीव्र स्वरूपाच्या आंदोलन स्वाभिमानी शेतकरी संघटना जुन्नर तालुका यांच्यावतीने पुणे जिल्हा अध्यक्ष प्रभाकर बांगर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येईल याची गांभीर्याने दखल महावितरण कंपनीने घ्यावी.
असा इशारा प्रमोद खांडगे पाटील प्रतिनिधी जुन्नर स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनी महावितरण कंपनीला दिला आहे.निवेदन देताना रमेश शिंदे अध्यक्ष सह्याद्री शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य हे उपस्थित होते.