समर्थ गुरुकुलच्या विद्यार्थ्यांचे आंतरराष्ट्रीय स्तरावर रंगोत्सव स्पर्धेत घवघवीत यश
1 min read
बेल्हे दि.१९:- समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ गुरुकुल, बेल्हे या सीबीएसई मान्यताप्राप्त इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील रंगोत्सव सेलिब्रेशन स्पर्धेत घवघवीत यश संपादन केल्याची माहिती समर्थ गुरुकुलचे प्राचार्य सतीश कुऱ्हे यांनी दिली.या स्पर्धेमध्ये समर्थ गुरुकुल च्या नर्सरी ते दहावीपर्यंतच्या एकूण ३२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. या सर्व विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय पदक, सरप्राईज गिफ्ट,सन्मान चिन्ह, डिजिटल वॉच, गिटार, स्पेक्टॅक्युलर परफॉर्मन्स अवॉर्ड, मल्टी कलर एलसीडी रायटिंग पॅड, जी शेप एलईडी लॅम्प विथ ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले.
रंगोत्सव सेलिब्रेशन रंगभरण स्पर्धेमध्ये समर्थ गुरुकुल मधील इयत्ता नर्सरी ते नववी पर्यंतच्या मुलांनी सहभाग घेतला होता. पहिला ग्रुप नर्सरी ते दुसरी पर्यंतच्या मुलांचा होता.त्यापैकी इयत्ता दुसरीतील सानवी अनिल गुंजाळ हिने ए प्लस ग्रेड मिळवत द्वितीय क्रमांक संपादन केला. बोट स्मार्टवॉच विथ ट्रॉफी देऊन या विद्यार्थिनीचा सन्मान करण्यात आला.
सिनियर के. जी तील उर्वी विकास बांगर हिने ए ग्रेड मिळून गिटार आणि सन्मानचिन्ह पटकावले.ईश्वरी संदीप भांबेरे इयत्ता पहिलीतील विद्यार्थिनीला सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. शुभदा शुभम पांडे, स्वरा विजय गुंजाळ, माही विष्णू आहेर, शरण्या नितीन गुंजाळ, अबीर साईनाथ सासवडे, आरुष निलेश नागरे, जिजा सुशील आवटी,
शौर्या श्रीधर झावरे, यशश्री हेमंत औटी यांना बी प्लस ग्रेड मिळून प्रमाणपत्र देण्यात आहे.पारस सागर मोरे, शरण्या नितीन गुंजाळ यांनी बी ग्रेड मिळवत उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले.इयत्ता तिसरी ते दहावी पर्यंतच्या ग्रुप मध्ये इयत्ता चौथी मधील स्वरा दीपक देशमाने हिने ए प्लस ग्रेड मिळवत मल्टी कलर रायटिंग पॅड आणि सन्मान चिन्ह पटकावले.
इयत्ता सहावी मधील गौरी बाबाजी चौधरी हिने ए प्लस ग्रेड मिळवत स्पोर्ट स्मार्ट वॉच आणि सन्मान चिन्ह पटकावले. इयत्ता सातवी मधील प्रांजल विजय येवले हिने हस्ताक्षर स्पर्धेत उत्तेजनार्थ क्रमांक मिळवत जी शेप एलईडी लॅम्प आणि प्रमाणपत्र प्राप्त झाले.इयत्ता सहावी मधील ऋतू देविदास मटाले आणि इयत्ता चौथी मधील साईराज पांडुरंग भांबेरे
यांनी रंगभरण स्पर्धेत सहभाग घेत प्रमाणपत्र व स्पेक्टॅकलर अवॉर्ड प्राप्त केला. तसेच श्रीनिका वल्लभ शेळके, श्रावणी बाबाजी चौधरी , मृण्मयी गणेश अल्हाट, समृद्धी विवेक शेळके , समृद्धी मल्हारी मेहेर, तनिष्का गोरक्षनाथ खुटाळ, प्रणव गोरक्ष कोरडे, वंश जालिंदर बांगर , श्रेया धनंजय गोफणे यांनी बी प्लस ग्रेड मिळवत प्रमाणपत्र व सन्मान पदक प्राप्त केले.
अमृता सतीश पाडेकर, श्रद्धा दत्तात्रय आग्रे व समृद्धी विवेक शेळके यांनी बी ग्रेड मिळवत उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले. या विद्यार्थ्यांना कला शिक्षिका दीप्ती चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. पारितोषिक वितरण माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके,गुरुकुल चे प्राचार्य सतीश कुऱ्हे,ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्या वैशालीताई आहेर,क्रीडा संचालक एच पी नरसुडे व सखाराम मातेले यांच्या हस्ते करण्यात आले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष वसंत शेळके, उपाध्यक्ष माऊली शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहल शेळके, सारिका शेळके, कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत, प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर तसेच संकुलातील सर्व प्राचार्य,
विभागप्रमुख,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य सतीश कुऱ्हे यांनी सूत्रसंचालन वैशाली सरोदे व शितल पाडेकर यांनी तर आभार रामचंद्र मते यांनी मानले.