मॉडर्नच्या विद्यार्थांनी भागवली पक्षांची तहान

1 min read

बेल्हे दि.१८:- बेल्हे (ता.जुन्नर) येथील मॉडर्न इंग्लिश स्कूल च्या चिमुकल्यानी शालेय परिसरातील ५० ते ६० झाडांवर, कंपाउंड भिंतीवर, गार्डनमध्ये, छतावर पक्षांसाठी पशुखाद्य व पाण्याची सोय केली आहे. पाण्यासाठी घरातील रिकामे डबडे, प्लॅस्टिकची भांडी व धान्य ठेवण्यासाठी पाण्याच्या टाकाऊ बाटल्यांचा वापर करून. त्यात गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ असे विविध प्रकारचे धान्य पक्षांना खाण्यासाठी ठेवले. प्रत्येक दोन दिवसानंतर त्या भांड्यांमधील पाणी तपासून परत ठेवण्यासाठी काही विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. आश्चर्य म्हणजे विद्यार्थ्यांच्या या उपक्रमानंतर काहीच वेळाने एक चिमणी छतावरील एका भांड्यामध्ये पाणी पिताना दिसली. व या पक्षांसाठी आपण एवढे तर नक्कीच करू शकतो याची विद्यार्थ्यांना जाणीव झाली. तालुक्यात सध्या प्रचंड तापमान वाढले असून ४० अंशाच्या वर पारा चढला आहे. उन्हाळ्यात पाण्याच्या आणि अन्नाच्या शोधात पक्षी अनेक ठिकाणी भटकंती करत असतात. कडक उन्हाळयात काही पक्षी पाण्याअभावी मरतात. त्यामुळे पशुसंवर्धनासाठी हा उपक्रम हाती घेतला.शालेय परिसरामध्ये अनेक कबूतर, चिमणी, कावळा, पारवा यासारखे पक्षी विद्यार्थ्याना येतात. पक्षी व प्राण्यांबाबत प्रेम, अस्मिता जपणे काळाची गरज असल्याचे यावेळी शिक्षकांनी विद्यार्थांनी सांगितले. पशु वाचवा, प्राणी वाचवा, आशा घोषणा दिल्या. या वेळी शाळेच्या प्राचार्या विद्या गाडगे यांनी या चिमुकल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले व घरी आपल्या घराजवळील परिसरात अशाच प्रकारे पशु पक्षांसाठी खाद्य ठेवण्यास सांगितले. यावेळी विश्वस्त दावला कणसे, प्राचार्या विद्या गाडगे, उपप्राचार्य के.पी सिंग, शाळेचे शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. सदर विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक सीए सावकार गुंजाळ, अध्यक्ष गोपीनाथ शिंदे, सीईओ शैलेश ढवळे यांनी कौतुक केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे