समर्थ फार्मसी च्या विनायक गाडगे यांची पुणे जिल्हा परिषद अंतर्गत औषधनिर्माण अधिकारी या पदावर नियुक्ती

1 min read

बेल्हे दि.१७:- समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी बेल्हे या औषधनिर्माण शास्त्र पदवी महाविद्यालयातील पहिल्या बॅचचा विद्यार्थी विनायक गाडगे याची पुणे जिल्हा परिषद पुणे अंतर्गत घेतल्या गेलेल्या स्पर्धा परीक्षेमध्ये औषधनिर्माण अधिकारी या पदासाठी अंतिम निवड यादी मध्ये निवड झाल्याची माहिती प्राचार्य डॉ.कुलदीप रामटेके यांनी दिली.पुणे जिल्हा परिषद पुणे अंतर्गत अंतिम निवड यादी नुकतीच जाहीर झाली.दोनशे गुणांच्या या परीक्षेमध्ये विनायक गडगे याने १५६ गुण मिळवून यश संपादन केले आहे.आणि शासकीय आरोग्य केंद्रामध्ये औषधनिर्माण अधिकारी या पदावर काम करण्याची संधी विनायक ला मिळणार आहे.या परीक्षेची तयारी करताना फार्मास्यूटिक्स,फार्माकोलोजी,फार्माकॉग्नसी या विषयांचा सखोल केलेला अभ्यास यामुळेच ही परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे विनायक गाडगे यांनी सांगितले.महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना सदर विषयाचे प्रात्यक्षिक ज्ञान आणि त्या प्रात्यक्षिक ज्ञानाबरोबर त्याला व्यावहारिकतेची जोड देण्यासाठी महाविद्यालयामार्फत राबवले जाणारे गेस्ट लेक्चर्स,कॉन्फरन्स,वेगवेगळ्या कार्यशाळा आणि विषय शिकवणाऱ्या शिक्षकांचे मोलाचे सहकार्य मिळाल्याचे यावेळी विनायक म्हणाला.पदविका आणि त्यानंतर पदवी असे दोन्हीही अभ्यासक्रम समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी या औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयामध्ये पूर्ण करत असताना सॉफ्ट स्कील,संभाषण कौशल्य या बाबींवर विशेष लक्ष दिले.पदव्युत्तर पदवी ला प्रवेश मिळवण्यासाठी आवश्यक असलेली जी-पेट ही परीक्षा विनायक दोन वेळा उत्तीर्ण झाल्याचे विभागप्रमुख डॉ.सचिन दातखिळे यांनी सांगितले. विद्यार्थी दशेमध्ये फक्त अभ्यास न करता आपल्या ज्ञानाचा उपयोग आपण ज्या समाजात राहतो त्यांना व्हावा म्हणून दरवर्षी जागतिक फार्मासिस्ट डे च्या निमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन समाजाला प्रबोधन करण्यासाठी व्याख्यानाच्या माध्यमातून फार्मासिस्ट आणि त्याची व्याप्ती समजून देण्याचे काम या विद्यार्थ्याने सातत्यपूर्ण चार वर्षांमध्ये केल्याचे प्राचार्य डॉ.कुलदीप रामटेके यांनी सांगितले.विनायक गाडगे हा सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातील गरजू व होतकरू विद्यार्थी असून गुणवत्ता व जिद्दीच्या जोरावर आज पुणे जिल्हा अंतर्गत औषध निर्माण अधिकारी या पदावर निवड झाल्याने आई वडिलांचे सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण झाल्याचे विनायक म्हणाला.विनायक ने मिळवलेल्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष वसंत शेळके, उपाध्यक्ष माऊली शेळके,सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, जिल्हा परिषद सदस्या स्नेहल शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.कुलदीप रामटेके, समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.संतोष घुले,तसेच सर्व विभागातील प्राचार्य,विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी हार्दिक अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे