दोन सख्ख्या बहिणीसह वाचविणाऱ्या तरुणास जलसमाधी

1 min read

कर्जत दि.१७:- कर्जत तालुक्यातील ताजू येथे कुकडी घोड कॅनॉलमध्ये पडून तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यात दोन सख्ख्या बहिणीचा समावेश आहे. तर त्यांना वाचवण्यासाठी कॅनॉलमध्ये उतरलेल्या तरुणाला देखील आपला जीव गमवावा लागला. बुधवारी (ता.१६) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. कृष्ण रामा पवळ (वय २५), ऐश्वर्या वणेश साबळे (वय ११) आणि दिपाली वणेश साबळे (वय १५, तिघे रा. बरकडे वस्ती, ताजू, ता.कर्जत) यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. ऐश्वर्या व दिपाली पाण्यात पडल्यावर वाचवा वाचवा असे ओरडत असताना, तिथून जवळून जाणारा कृष्णा पवळ याने हा आवाज ऐकून त्यांना वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली. त्या दोघींना वाचविण्याचा प्रयत्न करीत असताना तिघेही पाण्यात बुडून मयत झाल्याचे समजते आहे. याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे