शरदचंद्र पवार कॉलेज च्या विद्यार्थांनी राबवली स्वच्छता मोहीम
1 min read
शिवनेरी दि.४:- शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ इंजीनियरिंग डुंबरवाडीच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांकडून शिवनेरी गड संवर्धन मोहीम शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ इंजीनियरिंग डुंबरवाडी येथील राष्ट्रीय सेवा योजना या विभागाच्या वतीने सोमवार दिनांक २ फेब्रुवारी २०२६ रोजी जुन्नर येथील
ऐतिहासिक शिवनेरी गडावर किल्ले संवर्धन व स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात राष्ट्रीय सेवा योजनेतील ३० स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी गडाचा ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी
गड परिसरातील प्लॅस्टिक व इतर कचरा संकलन, पायवाटांची स्वच्छता तसेच पर्यटकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली. या कार्यक्रमाचे मार्गदर्शन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी स्वप्निल डुंबरे तसेच महाविद्यालय विकास विद्यार्थी विकास मंडळाचे अधिकारी डॉ मोनिका रोकडे व जुन्नर येथील वनपाल
नितीन विधाटे आणि वनरक्षक देविदास मिसाळ यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांना ऐतिहासिक स्थळांचे जतन व संवर्धन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याची सांगितले. “स्वच्छ गड – सुंदर गड,आपला गड -आपली जबाबदारी
” हा संदेश देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. भविष्यातही अशा प्रकारचे सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्याचा संकल्प महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी यावेळी केला.
