समर्थ अभियांत्रिकीच्या ऋतुजा गवांदे आणि वैष्णवी गणेश यांच्या “कृषीतज्ञ ” चे विविध स्पर्धांमध्ये यश

1 min read

बेल्हे दि.२१:- समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट, बेल्हे या अभियांत्रिकी महाविद्यालयातील कॉम्प्युटर इंजिनियरिंग च्या ऋतुजा गवांदे व वैष्णवी गणेश यांनी सादर केलेल्या “कृषीतज्ञ” या प्रकल्पास तालुका, जिल्हा, राज्य व देश पातळीवर विविध ठिकाणी पारितोषिके मिळाल्याची माहिती प्राचार्य डॉ.नवनाथ नरवडे यांनी दिली.अगस्त्या इंटरनॅशनल फाउंडेशन बंगलोर व सॅमसंग मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने लोणीकंद येथे आयोजित केलेल्या “अन्वेषण” या राज्यस्तरीय प्रकल्प स्पर्धेत ऋतुजा गवांदे व वैष्णवी गणेश यांनी सादर केलेल्या “कृषीतज्ञ” या प्रकल्पास प्रथम क्रमांक मिळाला. रुपये तीस हजार रोख, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले होते.त्याचप्रमाणे बँगलोर येथे झालेल्या “अन्वेषण” या राष्ट्रीय स्तरावरील प्रकल्प स्पर्धेतदेखील या विद्यार्थ्यांना “१०० टाईम्स क्युरियस क्वेश्चन अवार्ड ” हे विशेष पारितोषिक, तसेच रुपये पाच हजार रोख, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सदर विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.खोडद येथील जी एम आर टी मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित केलेल्या प्रकल्प स्पर्धेमध्ये या प्रकल्पास द्वितीय क्रमांक मिळाला.एकदिवसीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक प्रकल्प स्पर्धा “सृजन २०२५” मध्ये या प्रकल्पास विशेष पारितोषिक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे या ठिकाणी टेक्निकली कोस्पॉन्सर्ड बाय आय ट्रिपल इ बॉम्बे सेक्शन यांच्या वतीने नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या “प्रोटेक २०२५” – “थीम इनोवेशन्स फॉर फायनल इयर इंजिनियरिंग अँड डिप्लोमा स्टुडंट्स ” या नॅशनल लेवल प्रोजेक्ट अँड पोस्टर कॉम्पिटिशन मध्ये “कृषीतज्ञ” या प्रकल्पास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड इनोवेशन, वराळे येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रोजेक्ट बेस्ट लर्निंग या प्रकल्प स्पर्धेमध्ये “कृषीतज्ञ” या प्रकल्पास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.रुपये पाच हजार रोख व प्रशस्तीपत्रक असे बक्षिसाचे स्वरूप होते.सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग,वडगाव येथे झालेल्या कॉन्व्हेन या प्रकल्प स्पर्धेमध्ये “कृषीतज्ञ” या प्रकल्पास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.रुपये दिड हजार रोख व प्रशस्तीपत्रक असे या बक्षिसाचे स्वरूप होते.हा प्रकल्प तयार करण्यासाठी समर्थ अभियांत्रिकीच्या कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागप्रमुख प्रा.स्नेहा शेगर,इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागाचे विभागप्रमुख प्रा.निर्मल कोठारी,प्रा.अजिंक्य अभंग,प्रा.राणी बोऱ्हाडे यांनी मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष वसंत शेळके,उपाध्यक्ष माऊली शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहल शेळके कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदिप गाडेकर तसेच संकुलातील सर्व विभागाचे प्राचार्य, विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे