युपीएससीत पुण्याचा अर्चित डोंगरे भारतात तिसरा
1 min read
नवीदिल्ली दि.२२:- केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या युपीएससी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून शक्ति दुबे या उमेदवाराने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. तर, हर्षिता गोयल देशात दुसरी आली असून अर्चित डोंगरेने देशात तिसरा क्रमांक पटकावत बाजी मारली आहे. विशेष म्हणजे अर्चित डोंगरे हा मराठी असून महाराष्ट्रात पहिला आला आहे.अर्चित हा पुण्याचा रहिवाशी असून देशात तिसरा क्रमांक मिळवत त्याने महाराष्ट्राची व पुण्याची मान उंचावली आहे. यंदाही युपीएससी परीक्षेत महाराष्ट्राने आपली पताका फडकावली असून पुणे, ठाणेसह विविध जिल्ह्यातील उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत.
त्यामध्ये, मुलींनीही दैदिप्यमान कामगिरी बजावली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) २०२४ चा अंतिम निकाल मंगळवारी आला आहे. प्रयागराज येथील शक्ती दुबेने संपूर्ण भारतात अव्वल स्थान पटकावले आहे. हर्षिता गोयल दुसऱ्या स्थानावर आहे. तर तिसऱ्या स्थानावर डोंगरे अर्चित पराग आहे.
दरवर्षी देशभरातून लाखो उमेदवार यूपीएससीच्या या प्रतिष्ठित परीक्षेत सहभागी होतात. मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सुमारे २८४५ उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आले.यूपीएससी परीक्षा ही सप्टेंबर महिन्यात झाली होती. त्यानंतर पर्सनॅलिटी टेस्ट जानेवारी महिन्यात झली होती.
यानंतर त्यातील २४१ उमेदवारांची निवड कण्यात येणार होती. एकूण १००९ उमेदवारांची निवड झाली होती. त्यातून आता २४१ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. शक्ती दुबे याने पहिली रँक मिळवली आहे. यानंतर हर्शिता गोयलने दुसरी रँक तर अर्चितने तिसरी रँक मिळवली आहे.
यानंतर शाह मार्गी चिराग याने चौथी रँक मिळवली आहे. आकाश गर्ग याने पाचवी रँक मिळवली आहे. कोमल पुनिया यांने सहावी रँक प्राप्त केली आहे. आयुषी बन्सलने सातवी रँक प्राप्त केली आहे. राज क्रिष्णा झा याने आठवी तर आदित्य विक्रम अग्रवाल याने नववी रँक प्राप्त केली आहे. मयंक त्रिपाठी हे यूपीएससी परीक्षेत देशातून दहावे आले आहेत.