उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीच्या प्रश्नावर राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य
1 min read
मुंबई दि.१९:- मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी एक उद्धव ठाकरेंच्या शिवसेनासोबतच्या युतीवर मोठं विधान केलं आहे.आमच्यातील वाद, आमच्यातील भांडणं, आमच्यातील गोष्टी किरकोळ आहेत. त्यापेक्षा महाराष्ट्र खूप मोठा आहे. या महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं, हे वाद या गोष्टी अत्यंत शुल्लक आहेत, असं राज ठाकरे म्हणाले आहेत. महेश मांजरेकरांनी घेतलेल्या मुलाखतीत राज ठाकरेंनी यावर भाष्य केलं आहे.राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र यावेत ही अनेकांची इच्छा आहे. ठाकरे बंधुनी एकत्र यावे अशी इच्छा अनेक नेत्यांनी याआधी बोलून दाखवली आहे. राज ठाकरे यांना पुन्हा एकदा यावर भाष्य केलं आहे. आमच्यातली भांडणे, वाद खूप छोटे आहेत.
महाराष्ट्र खूप मोठा, असं राज ठाकरे यांनी म्हटलं. महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरे यांना यावर सविस्तर भाष्य केलं आहे.उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी एकत्र यावे हे अख्ख्या महाराष्ट्राचं स्वप्न आहे. यासाठी तुम्ही पुढे येणार का? महेश मांजरेकरांच्या या प्रश्नावर बोलताना राज ठाकरे यांनी म्हटलं की, महाराष्ट्र खूप मोठा आहे.
कुठल्याही मोठ्या गोष्टीसाठी आमच्यातले वाद किरकोळ आहेत. महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणे आणि हे वाद शुल्लक आहेत. एकत्र येणे आणि एकत्र राहाणे फार कठीण गोष्ट आहे, मला असं वाटत नाही.
परंतु विषय फक्त इच्छेचा आहे. फक्त माझ्या इच्छेचा किंवा स्वार्थाचा विषय नाही. महाराष्ट्राचा स्वार्थ मी पाहतच आहे. मी तर म्हणतो सगळ्या महाराष्ट्रातील पक्षातील मराठी नेत्यांनी एकत्र येऊन एकच पक्ष काढावा, असंही राज ठाकरे यांनी म्हटलं.
महाराष्ट्रासाठी या सर्व गोष्टी घडल्या पाहिजेत-संदीप देशपांडे
मला वाटतं राज साहेब बोलले त्यातील आणखी एक महत्त्वाचं वाक्य आहे. ते वाक्य आहे की, ‘समोरच्याची इच्छा आहे की नाही? हे जोपर्यंत समजत नाही, तोपर्यंत या गोष्टीला अर्थ नाही. आम्हाला सर्वांना वाटतं की, महाराष्ट्रासाठी या सर्व गोष्टी घडल्या पाहिजेत. मात्र, हे जसं आम्हाला वाटतं, तसं समोरच्यांना वाटतं की नाही? हा महत्त्वाचा प्रश्न आहे, असं मनसेचे नेते संदीप देशपांडे म्हणाले.
मराठी माणूस म्हणून सगळ्या शक्ती एकत्र येणं गरजेचं- अंबादास दानवे
उद्धव ठाकरे असतील किंवा राज ठाकरे असतील, हे दोघं तसे भाऊ आहेत. या विषयावर भले महाराष्ट्र चर्चा करत असेल. नेते प्रसार माध्यमं चर्चा करत असतील. परंतु भावाभावांचं नात आहे, हे तर सर्वांनी मान्य केलं पाहिजे. राजकीय विषय स्वतंत्र आहेत. उद्धव साहेबांना किंवा त्यांच्या संघटनेला त्रास होईल, अशाच पद्धतीने राज ठाकरे यांनी भूमिका घेतल्या आहेत, असं ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे म्हणाले. मराठी माणूस म्हणून सगळ्या शक्ती एकत्र ऐन गरजेचं आहे. मला वाटत चॅनल मध्ये बोलून प्रस्ताव देता येत नसतो.
यासाठी अनेक मार्ग आहे, असं अंबादास दानवे यांनी सांगितले. आताची मुलाखत समोर आली म्हणून विषय व्हावा म्हणून चर्चा होण्याची गरज नाही. याबाबत मध्यस्थी करण्याबाबत अनेक लोक आहे, असं अंबादास दानवेंनी स्पष्ट केले.