“छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये”, अमित शाह यांच्या रायगड दौऱ्यावर उद्धव ठाकरेंची टीका
1 min read
मुंबई दि.१७:- शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) राज्यभरात होणाऱ्या विभागीय शिबिरांची सुरुवात आज नाशिकपासून झाली. या शिबिरात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाशिक जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या अमित शाह यांच्या रायगड दौऱ्यावरही जोरदार टीका केली.या रायगड दौऱ्यात अमित शाह यांनी शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचे म्हणत उद्धव ठाकरे यांनी, त्यांनी आम्हाला शिवाजी महाराजांबद्दल शिकवू नये असे म्हटले. याचबरोबर त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांचा पुतळा, हिंदुत्त्व आणि वक्फ विधेयकाबाबतही भाष्य केले आहे.
महाराजांचा अपमान करणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे अमित शाह यांच्यावर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, “रायगडावर काही दिवसांपूर्वी झालेल्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शिवाजी महाराजांचा अपमाण करणाऱ्याला टकमक टोकावरून ढकलावे असे वाटते.
पण, ते पुढचे बोलण्याच्या आधी कोणीतरी सांगितले की, अमित शाह हेच महाराजांबाबत एकेरी बोलले आहेत. शिवाजी महाराजांचा उल्लेख त्यांनी एकेरी नावात केला आहे. यानंतर ते थांबले, कारण महिती आहे, तुमच्या शेंड्या त्यांच्या हातात आहेत.”
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “शिवाजी महाराजांचा अपमान करणारे कोणीही असले तरी, त्याला शिक्षा झालीच पाहिजे. ही शिवशाही आपण पाळणार असू तर आपण छत्रपतींचे नाव घेऊ शकतो.”कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर टीका यावेळी उद्धव ठाकरे यांनी लाडकी बहीण योजना आणि शेतकरी कर्जमाफीवरही भाष्य केले. याचबरोबर त्यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी गेल्या काही काळात शेतकऱ्यांबाबत केलेल्या विधानांवरही टीका केले. ते म्हणाले, “नमो शेतकरी योजनेचे पैसे ३१ मार्चपर्यंत येणार होते.
पण, १६ एप्रिल आहे, हे पैसे कुठे गेले? उलट शेतकऱ्यांची चेष्टा लवली आहे. मंत्री कोकाटे शेतकऱ्यांना विचारतात तुम्हाला लग्न, साखरपुडे करायला पैसे हवे आहेत का? अरे तुमचे काय जाते.”छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक नाशिक येथे पक्षाच्या या मेळाव्यात बोलताना,
उद्धव ठाकरे यांनी राज्यातील भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने मुंबईतील राजभवन परिसराचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकात रूपांतर करावे आणि राज्यपालांना दुसरीकडे हलवावे अशी मागणीही केली.