छगन भुजबळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला; चर्चांना उधाण

1 min read

मुंबई दि.१:- महाराष्ट्राचे माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नाराज असल्याची चर्चा आहे. भुजबळ यांना नव्या महायुती सरकारमध्ये मंत्रिमंडळ बैठकीत स्थान मिळालं नाही. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा होती.याशिवाय छगन भुजबळ यांना राज्यसभेचीदेखील संधी मिळाली नाही. त्यामुळे याबाबतची खंत त्यांनी भर पत्रकार परिषदेत व्यक्त केली होती. यानंतर आता छगन भुजबळ देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले आहेत. छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी जावून त्यांची भेट घेतली आहे. छगन भुजबळ यांच्या भोवती असणारं राजकारण पाहता या भेटीला जास्त महत्त्व प्राप्त झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने जो निर्णय घेतला, देशात जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल आम्ही सर्व देशातील ओबीसी, भटके-विमुक्त आनंदीत आहोत.आम्ही सर्व त्यांचे आभार मानतो आहोत. आम्हाला ताबोडतोब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणं शक्य नाही. त्यामुळे मी स्वत: जावून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांना पुष्पगुच्छ दिलं आणि आभार मानले. त्यांना सांगितलं की, मोदींना सुद्धा कळवा”, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली. खरंतर ही जातगणना 1930 पर्यंत इंग्रज सरकार करत होतं. त्यांच्या अगोदर 70 वर्षे ते सरकार करत होतं. त्यानंतर महायुद्ध वगैरे सुरु झालं त्यामुळे थांबलं. पुढे स्वातंत्र्य मिळालं, त्यानंतर जातगणना झाली नाही. महात्मा फुले समता परिषद निर्माण झाल्यानंतर तेव्हापासून आमच्या प्रत्येक रॅलीत जातगणना लागू करा ही आमची पहिली मागणी आहे”, असंही छगन भुजबळ यावेळी म्हणाले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे