लग्नमंडपातच वडिलांचा मृत्यू
1 min read
भंडारा दि.१:- मुलीच्या डोक्यावर अक्षता टाकताच लग्न मंडपातच वडिलांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील झारली गावात दुपारी ३ च्या सुमारास ही घटना घडली. लग्न लागत असतानाच वडिलांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गाव हळहळले आहे. गणेश खरवडे (५४) असे मृत वडिलांचे नाव आहे.मुलीच्या लग्नातच वडिलांचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृत वडील गणेश वरखडे हे अल्पभूधारक शेतकरी असून त्यांच्याकडे एक एकर शेती आहे. आपल्या लेकीच्या लग्नासाठी कष्टाने पैसा उभा करत थाटात लग्न लावले. दुपारी मुलीचे कन्यादान झाले व पाहुण्यांची वर्दळ सुरू झाली.
त्यावेळी स्टेजवरच वधूच्या वडिलांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि तिथेच ते कोसळले व तिथेच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे कुटुंबावर मोठे दुःख कोसळले आहे. तसेच वडिलांच्या अचानक निधनामुळे वधूची पाठवणी देखील थांबवण्यात आली आहे.