दिलीप वळसे पाटील महाविद्यालयात ‘महाराष्ट्र दिन’ निमित्त ध्वजवंदन
1 min read
निमगाव सावा दि.१:- येथे महाराष्ट्र राज्याचा ६६ वा स्थापना दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयीन ग्रंथपाल मंगल सुधाकर उनवणे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार यांनी सर्वांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या.
या कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. प्रल्हाद शिंदे, कला शाखाप्रमुख प्रा. सुभाष घोडे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. अनिल पडवळ, विज्ञान शाखाप्रमुख प्रवीण गोरडे, प्रा. अजय ननवरे, प्रा योगेश भालेराव, अनिकेत वायकर, पराग कराळे, पूजा थिगळे, शांताराम गाडगे, जितेंद्र बोटकर यांच्यासह सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते.