राजुरीतील सह्याद्री व्हॅलीत कॅम्पस ड्राइव्ह मध्ये ३० विद्यार्थ्यांची कंपनी तर्फे निवड

1 min read

राजुरी दि.१:- महारिया चॅरिटेबल ट्रस्ट संचालित सह्याद्री व्हॅली कॉलेज ऑफ इंजिनीरिंग अँड टेक्नॉलॉजी राजुरी या महाविद्यालयात, बुधवार दि. ३० एप्रिल रोजी, औदयोगिक नगरी चाकण (पुणे) येथील लिमिटेड कंपनी रेणुका ऑटोकास्ट टेक लिमिटेड या कंपनीला विद्यालयाच्या वतीने आमंत्रीत करून

विद्यार्थी च्या उज्ज्वल भविष्यासाठी कॉलेज मधील गुणवंत विध्यार्थ्यां साठी कॉलेज च्या वतीने कॅम्पस मुलाखती घेण्यात आल्या. त्यामध्ये आय. टी.आय व डिप्लोमा च्या अनेक विद्यार्थी व विद्यार्थीनी नी सहभाग नोंदवला व मुलाखती घेण्याकरीता कंपनी चे मॅनेजर मिलिंद कोडपे (QA मॅनेजर), अविनाश लंघे (मॅनेजर), अजित डुकरे (QA)

H. R निकिता कानवडे या टीम ने मुलाखती घेतल्या, तसेच मुलाखती दरम्यान 12 गुणवंत विद्यार्थ्यांची निवड कंपनी तर्फे करण्यात आली, तसेच मुलाखतीचे नियोजन, प्रा.मुरलीधर कुरकुटे, प्रा. आभाळे, प्रा. निचित मॅडम, प्रा. साळुंखे, प्रा. नेहे यांनी केले. तसेंच प्रमुख पाहुणे जिवन शिंदे ( माजी पंचायत समिती सदस्य जुन्नर),

उद्योजक पप्पू डोंगरे यांनी निवड झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व संस्थेचे खजिनदार सचिन चव्हाण यांनी कंपनी चे मॅनेजर तसेच टीम चा सत्कार सन्मान केला. आणि संस्थेचे उप प्राचार्य पी.बालारामडू यांनी कंपनी व टीम चे व मॅनेजर यांचे आभार व्यक्त केले.

तसेच शनिवार दि. 26 एप्रिल रोजी रांजणगाव (पुणे) येथील मल्टीनॅशनल कंपनी मदरसन ऑटोमोटिव्ह टेकनॉलॉजी आणि इंजिनीरिंग या कंपनीस विद्यालयाच्या वतीने आमंत्रीत करून विद्यार्थी च्या उज्ज्वल भविष्यासाठी कॉलेज मधील गुणवंत विद्यार्थी साठी कॅम्पस मुलाखती घेण्यात आल्या.

त्यामध्ये आय. टी.आय व डिप्लोमा च्या अनेक विद्यार्थी व विद्यार्थीनी सहभाग नोंदवला व मुलाखती घेण्याकरीता मदरसन कंपनी चे सिनिअर H. R संतोष चौधरी तसेंच टीम ने मुलाखती घेतल्या. यात १८ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. दोन्ही कंपनीत एकूण ३० विद्यार्थांनी निवड झाली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे