आसिफ मोमीन यांना युवा महाराष्ट्र फाउंडेशन चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान

1 min read

अळकुटी दि.१:- पारनेर तालुक्यातील आळकुटी येथील आसिफ मुनीरखॉ मोमीन यांना युवा महाराष्ट्र फाउंडेशन आयोजित महाराष्ट्र भूषण सन्मान पुरस्कार 2025 पुणे या ठिकाणी देण्यात आला. यावेळी युवा महाराष्ट्र फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर अविनाश संकुडे व सरचिटणीस गणेश विटकर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी अभिनेत्री सराहा मोतीलाल यांच्या हस्ते यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. पारनेर तालुक्यातील आळकुटी या गावात राहत असलेले आसिफ मोमीन यांनी वयाच्या पंचविसाव्या वर्षी आपल्या बंधू च्या साथीने ए.एम एंटरप्राइजेस नावाने छोटासा व्यवसाय 2011 मध्ये चालू केला. त्या वेळच्या प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी कष्टाची तमांना बाळगता अतिशय जिद्दीने हा व्यवसाय नावारूपास आणला. आपल्या जिद्दीच्या व चिकाटीच्या जोरावर छोट्याशा कंपनीत रूपांतर केले व गावातील काही बेरोजगार महिला व तरुणांना आपल्या कंपनीत रोजगार मिळवून दिला. हळूहळू प्रगती करत नवनवीन तंत्रज्ञान नवीन टेक्नॉलॉजीच्या मशीन चा वापर करून आपल्या कंपनीतील विविध प्रकारच्या वह्या बनवणे, उत्तर पत्रिका बनवणे, स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून दिला. व आपल्या कंपनीचे उत्पादन वाढवले व हेच उत्पादन स्थानिक बाजारपेठे बरोबरच आसपासचे तालुके तसेच अहिल्यानगर, औरंगाबाद, पुणे, सातारा अशा अनेक ठिकाणी शाळा कॉलेज इंग्लिश मीडियम स्कूल तसेच छोटे-मोठे दुकानदार होलसेलर व रिटेलर यांना मागणीच्या प्रमाणात व वेळेत पुरविण्यात येते. ए. एम एंटरप्राइजेस क्लासमास्टर व चेकमेट या नावाने नोटबुक उपलब्ध आहेत. या छोट्याशा व्यवसायाचे रूपांतर कारखानदारीत करत त्यांनी आपल्या व्यवसायात प्रगती केली. एका छोट्याशा गावातून हा व्यवसाय करत प्रगती केली. अशा उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. ही माहिती मिळताच भाजपचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे यांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी आसिफ मोमीन यांचे बंधू अनवर मोमीन, समीर मोमीन, रईस मोमीन तसेच भाजपचे मंडल अध्यक्ष किसन शिंदे, महेंद्र शिरोळे, चंद्रकांत शिंदे, असलम शेख उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे