वडील-मुलाचे नाते हे मित्रत्वाचे असावे:- शंकर महाराज शेवाळे
1 min read
मुळशी दि.१:- अनेक अपत्य असून उपयोग नाही, एकच अपत्य असावे पण ते स्वामी विवेकानंद सारखे असावे. वडिल व मुलाचे नाते हे मित्रत्वाचे असावे. वडील गेल्यानंतर त्याच्या स्मृतीजवळ ठेवून जगावे. वडील जसे वागतात मुलेही तेच अनुकरण करतात. बाप सैराट असला की, मुलेही सैराट होऊ लागतात. पैसा असला तरी राबणे जमत नाही. एकत्र आला की विरह हा होतोच असे धर्माचार्य हभप शंकर महाराज शेवाळे यांनी दखणे चाले -(ता. मुळशी) येथे किर्तनावेळी सांगितले.दखणे – चाले येथे युवा नेते मधूर दाभाडे यांच्या वतीने हभप शंकर महाराज शेवाळे यांच्या किर्तन सप्ताह महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी शेवटच्या दिवशी काल्याचे किर्तन पार पडले. याप्रसंगी महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ, सचिन खैरे, स्वाती ढमाले, अमित कंधारे, रविद्र कंधारे, लहू चव्हाण, दगडू करंजावणे, विजय सातपुते, यशवंत गायकवाड, बाळासाहेब शेडगे, अक्षय सातपुते, राणी शिंदे, गणेश धनवे, अमित पिंगळे उपस्थित होते.
यावेळी महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ, हभप कृष्णा महाराज पडवळ, सोमनाथ महाराज साठे, तहसीलदार अजित गायकवाड, आयुषा इंगवले, हिमानी चोंधे, पंढरीनाथ दुडे, राजवर्धन शेडगे, साईराज पारखी, पैलवान यश पिंगळे, वेद मारणे यांना मुळशी शौर्य पुरस्काने सन्मानित करण्यात आले. तसेच माजी सभापती रविंद्र कंधारे यांचाही यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.