कौतुकास्पद! विद्यानिकेतनच्या ३४ विद्यार्थ्यांना सुवर्णपदके
1 min read
साकोरी दि.१५:- विद्यानिकेतन इंटरनॅशनल अकॅडमी, साकोरी येथे नोव्हेंबर २०२४-२५ मध्ये सिल्व्हर झोन फाउंडेशन, नवी दिल्ली मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत विद्यानिकेतन च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले. हिंदी ऑलिम्पियाड मध्ये एकूण २४ विद्यार्थ्यांनी सुवर्णपदके,१२ विद्यार्थ्यांनी रौप्यपदके आणि ७ विद्यार्थ्यांनी कांस्यपदके पटकावली. तसेच गणित विषयामध्ये ५ विद्यार्थ्यांनी सुवर्ण पदके, ६ विद्यार्थ्यांनी रौप्य पदके आणि ४ विद्यार्थ्यांनी कांस्य पदके सोशल सायन्स विषयामध्ये सुवर्णं पदके – ५, रौप्य पदके २ कांस्य पदके पटकावली.
सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी बक्षीस वितरण समारंभ घेण्यात आला.शाळेत सर्व विषयांसाठी ऑलिम्पियाड स्पर्धा परीक्षा घेण्यात आली होती. ऑलिम्पियाड स्पर्धा परीक्षा एक प्रकारची स्पर्धात्मक परीक्षा आहे जी शाळांमध्ये घेतली जाते, ज्यामध्ये सर्वोत्तम क्षमता, प्रतिभा,
अभिरुची आणि बुद्धिमत्ता असलेल्या अपवादात्मक विद्यार्थ्यांना निवडले जाते. ऑलिंपियाड केवळ मूलभूत विषयांचीच चाचणी घेत नाहीत तर ते मुलांमध्ये तार्किक तर्कशक्ती देखील वाढवतात. ते विचार करण्याची क्षमता, समस्या सोडवण्याची कौशल्ये, आत्मविश्वास वाढवतात आणि म्हणूनच; लहान वयातच मुलाची सर्वांगीण वाढ होण्यास मदत करतात.
विद्यालयातील अगदी ज्युनिअर के. जी ते ९ वी पर्यंतच्या अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी हिंदी, सोशल सायन्स, गणित विषयांचा निकाल लागला. या समारंभासाठी संस्थेचे संस्थापक पांडुरंग साळवे तसेच विद्यालयाच्या प्राचार्या रुपाली पवार (भालेराव),
उपप्राचार्य शरद गोरडे, पी एम हायस्कुलचे प्राचार्य रमेश शेवाळे तसेच सर्व शिक्षक उपस्थित होते. संस्थापक तसेच प्राचार्या यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले व त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या संपूर्ण स्पर्धा परीक्षेचे नियोजन विभाग प्रमुख गणेश कर्डिले यांनी केले.
तसेच प्रतिभा गाडगे, प्रवीण अहिरे, नूतन भोर यांनी सर्व विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करून या परीक्षेची तयारी करून घेतली. त्यासाठी प्राचार्या रुपाली पवार (भालेराव ) यांनी सर्व शिक्षकांचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या.