ग्रामीण भागात शाळांच्या पायाभूत सुविधांसह शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी रोटरीचे कार्य महत्वपूर्ण:-दीपक सोनवणे

1 min read

पिंपळवंडी दि.१५:- रोटरी क्लब ही आरोग्य, शिक्षण, अर्थ, साक्षरता, पर्यावरण, समाज विकास, पाणी, अशा विविध महत्त्वाच्या विषयांवर तळागाळातील गरजूंपर्यंत पोहचत त्यांना मदत करणारी जागतिक पातळीवरील सामाजिक संस्था आहे.असे मत रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरी अध्यक्ष दीपक सोनवणे यानी मांडले.चाळकवाडी येथील शिवांजली शैक्षणिक संकुलात शिवांजली विद्यानिकेतन, अंगणवाडी शाळा सोनवणे मळा तसेच अकोले तालुक्यतील कळंब येथिल कर्मयोगी मारुतीराव लांडगे माध्यमिक शाळेला जी.डी.बी.पेंट आणि कोटिंग्ज (सी.एस.आर) फंडातून रोटरी क्लब ऑफ पुना मिडटाऊन व रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरी यांच्या संयुक्त विद्यमाने शाळा रंगकाम नंतर भित्तीफलकाचे उद्घाटन क्लब प्रेसिडेंट रोटेरीयन दीपक सोनवणे तसेच सेक्रेटरी डॉ.संतोष मोरे, मेडिकल डायरेक्टर डॉ.योगेश गाडेकर,एनव्हायरमेंट डायरेक्टर आण्णासाहेब मटाले, सुनील पाटे पाटील, विशाल जुन्नर प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोक सोनवणे, तसेच विद्यालयाचे संचालक तुळशिराम नरवडे, गजानन चाळक, विजय सोनवणे, मुख्याध्यापक श्रीयुत भानुदास चासकर, माधव लांडगे, संजय वाघ, संतोष चव्हाण, प्रशांत शेटे, विष्णु बोरसे, बंडू सदामते, सुषमा भांगे, संतू जेडगुले, श्याम मालुंजकर, व्यंकटेश कुलकर्णी, अण्णासाहेब घुले, बाळु बारवेकर, महेश कुरहाडे, सुधाकर काकडे, निवृत्ती भांगे, बाळु जाधव,बंडू बोचरे, चंद्रकांत साळवे, बाळकृष्ण माकरे, संपत लांडगे, यांच्या उपस्थितीत पार पडले. शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासक्रम स्टडी अ‍ॅप, साॅफ्टवेअर सह ई-लर्निंग सेटचे वितरणही यापूर्वी रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरीच्या वतीने करण्यात आले आहे. शाळेला नुकताच मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा, तसेच जिल्हा परिषदेचा स्वच्छ शाळा, तालुकास्तरीय किल्ले प्रदर्शनामध्ये विशेष मानांकन मिळाल्याबद्दल उपस्थितांनी संस्थेचे पदाधिकारी व शिक्षकांचे कौतुक केले.या उपक्रमासाठी जिल्हा प्रकल्प समन्वयक ममता कोल्हटकर, कंपनी समन्वयक अतुल कुलकर्णी यानी विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रूपाली मोरे होत्या. प्रास्ताविक डाॅ.योगेश गाडेकर यांनी तर सेक्रेटरी डॉ.संतोष मोरे, अशोक सोनवणे, कार्यक्रमाच्या अध्यक्ष फर्स्ट लेडी रूपाली मोरे व संस्थेच्या वतीने संचालक तुळशिराम नरवडे यांनी मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापक शभानुदास चासकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अशोक कुऱ्हाडे यांनी केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे