खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांदावर जाऊन पाहणी

1 min read

जुन्नर दि.१५:- शिरूर लोकसभा मतदारसंघातील जुन्नर महसूल मंडलातील पारुंडे, येणेरे, काले, दातखिळवाडी, बुचकेवाडी, काटेडे, विठ्ठलवाडी,

गोळेगाव, आलदरे, पिंपळगाव सिद्धनाथ, गोद्रे, कुमशेत, आगर, सोमंतवाडी, पाडळी, बागायत बुद्रुक व खुर्द, हापुसबाग, बादशाह तलाव आणि जुन्नर येथे अतिवृष्टी झाली. तर मढ महसूल मंडलातील पारगाव तर्फे मढ, सितेवाडी, वाटखळे, बगाडवाडी या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर गारपीट आणि अतिवृष्टी झाली.

या गारपीट व अतिवृष्टीमुळे बाधित गावांतील रब्बी पिकांपैकी कांदा, फळबाग/आंबा व इतर भाजीपाला आदी पिकांचे मोठे नुकसान झाले. त्याचबरोबर गोद्रे आणि कुसूर गावांतील घरांची कौलं आणि पत्रे उडाल्याने घरांचेही नुकसान झाले आहे.या संकटाची दखल घेऊन मढ महसूल मंडळातील वाटखळे, पांगरी गावाची पाहणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली. या पाहणी दरम्यान नुकसान झालेल्या शेतकऱ्यांशी चर्चा करुन त्यांच्या नुकसानीचा आढावा घेतला. अतिवृष्टी व गारपीट झालेल्या गावातील पीकांच्या आणि घरांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावेत, तसेच तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यासाठी कार्यवाही सुरू करावी असे निर्देश तहसीलदार, महसूल विभाग व कृषी अधिकारी यांना दिले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे