जमिनीच्या वादातून केंदूरमध्ये बहिणींसह वडिलांना मारहाण

1 min read

शिक्रापूर दि.१६:- शिरुर तालुक्यातील केंदूर येथे वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून एका सख्ख्या बहिणीसह वडिलांना मारहाण करण्यात आल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.याप्रकरणी फक्कड ठकाराम साकोरे, रवींद्र फक्कड साकोरे, राजेंद्र फक्कड साकोरे, सुलोचना फक्कड साकोरे, संभाजी सुदाम साकोरे, ललिता संभाजी साकोरे (सर्व रा. महादेववाडी केंदूर ता. शिरूर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. केंदूर येथे छबुबाई आदक यांच्या वडिलांची वडिलोपार्जित शेतजमीन असून जमिनीचे वाटप झालेले नसल्याने छबुबाई त्याच्या बहिणींसह वडिलांकडे जमिनीच्या वाटपाबाबत चर्चा

करण्यासाठी गेलेल्या असताना त्यांचा भाऊ फक्कड साकोरे यांसह त्याच्या मुलाने वाद घालत शिवीगाळ, दमदाटी केली. त्यामुळे सर्वजण पुन्हा घरी गेले. (छबुबाई आदक त्यांच्या बहिणी शकुंतला ननवरे, अंजनाबाई तांबे, भाऊ पांडुरंग साकोरे, मुलगा स्वप्नील आदक हे वडिलांच्या घरी माहेरी जाऊन भाऊ फक्कड याला बोलावून घेत आम्हाला त्या दिवशी शिवीगाळ का केली, याबाबत विचारणा केली. त्यावेळी फक्कड साकोरे, भाचा रवींद्र साकोरे, राजेंद्र साकोरे, सुलोचना साकोरे, संभाजी साकोरे, ललिता साकोरे यांनी सर्वांना शिवीगाळ, दमदाटी करत काठीने मारहाण करीत जखमी केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे