संकल्प व उम्मतची समाजासाठी सेवा; आरोग्यदायी जीवनाची वाटचाल
1 min read
राजुरी दि.२१:- संकल्प बहुउद्देशीय युवा संस्था आणि उम्मत की खिदमत फाउंडेशन यांच्या सेवाभावी कार्याचा आणखी एक सोनेरी अध्याय, संस्थेचे मुख्य प्रवर्तक हाजी गुलामनबी शेख यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत डॉ. पंजाबराव कथे फाउंडेशन, नारायणगाव व मोहन ठुसे नेत्र रुग्णालय व संशोधन संस्था. नारायणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने प्राथमिक आरोग्य केंद्र, राजुरी येथे महिलांसाठी मोफत कर्करोग तपासणी, मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले.शिबिरात महिलांसाठी मोफत कर्करोग तपासणीसह मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी विशेष तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा उपलब्ध होती.
यामुळे ग्रामीण भागातील गरजू नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. आरोग्य सुविधा ही फक्त आर्थिकदृष्ट्या सक्षम लोकांसाठी नसावी, या विचाराने प्रेरित होऊन या शिबिराचा उद्देश गोरगरीब, दुर्बल घटकांपर्यंत दर्जेदार आरोग्य सेवा पोहोचवणे होता.
उद्घाटन प्रसंगी पंचायत समिती जुन्नरचे मा. सभापती दीपक औटी, सरपंच प्रिया हाडवळे, उपसरपंच माऊली शेळके, डॉ. पंजाबराव कथे, डॉ.संदीप डोळे, डॉ. स्वाती पाटील, डॉ.अमोल बांगर, हेमलता शिंदे, स्वाती बोरचटे, वल्लभ शेळके सर, एम डी घंगाळे, पप्पू हाडवळे, जयसिंग औटी.
अनिस पटेल, सादिक आतार, जुबेर शेख, अकबर पठाण, अब्दुल समद इनामदार, रौफ खान तसेच समाजातील विविध संस्थांचे पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी दीपक औटी यांनी संस्थेच्या १० वर्षांच्या सामाजिक योगदानाचे विशेष कौतुक करत, समाजाच्या प्रत्येक घटकाला आधार देणाऱ्या या कार्याचे महत्व सांगितले. तर वल्लभ शेळके यांनी संस्थेच्या सामाजिक कार्याचा उल्लेख करताना विशेषतः ग्रामीण भागातील गरीब आणि वंचितांसाठी या संस्थेच्या उपक्रमांची शासनस्तरावर दखल घेतली जात असल्याचे अभिमानाने सांगितले.हाजी गुलामनबी शेख यांनी प्रास्ताविक करताना.
संस्थेच्या मागील दशकभरातील कार्याचे उल्लेख करताना, राजुरी गाव आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांच्या सहकार्याशिवाय हे यश शक्य नसल्याचे नमूद केले. त्यांनी सांगितले की, समाजातील प्रत्येक घटकाला चांगले आरोग्य व शिक्षण मिळावे, हा आमचा उद्देश आहे. त्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहणार आहोत.
या यशस्वी आरोग्य शिबिरासाठी संस्थेचे पदाधिकारी मेहबूब काझी, शाकीर चौगुले, कलीम पटेल, मुबीन शेख, वाजिद इनामदार, शकुर चौगुले, मुजम्मील पठाण, हारून पटेल, जीलानी पटेल, आरिफ पटेल, इम्तियाज पटेल, सोहेल शेख, जब्बार इनामदार, आदिल पटेल आणि सर्व स्वयंसवेकांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुबारक तांबोळी यांनी केले, तर आभार प्रदर्शन जाकीर पटेल यांनी केले.