पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत शिरूर लोकसभा मतदार संघाला २२ कोटी:- खासदार डॉ.अमोल कोल्हे
1 min read
शिरूर दि.१३:- शिरूर लोकसभा मतदारसंघातील विविध रस्त्यांच्या कामांसाठी पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत २२ कोटी ६४ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी दिली.या मध्ये रा.म. ६० चाकण ते रोहकल : ५.३५ कि.मी. – रु. ४३७.३८ लक्ष तर खेड, सातकरस्थळ. बहिरवाडी, बुट्टेवाडी ते मिरजेवाडी : ६.७७५ कि.मी. – रु. ६३२.९६ लक्ष तसेच प्रजिमा ११५ पिंपरी दुमाला ते वाघाळे, वरुडे, खैरेवाडी, धामारी, करंदी ते राज्यमार्ग ११७ : ११.७७५ कि.मी. – रु. ११९४.२९ लक्ष या रस्त्यांचा समावेश आहे.
या मार्गांसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. खरंतर मागच्याच टप्प्यात या कामांना मंजुरी मिळणे अपेक्षित होते, मात्र काही तांत्रिक कारणास्तव मंजुरी मिळाली नव्हती. तरीही पाठपुराव्यात सातत्य राखता पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या कार्यकारी अभियंत्यांना सुधारित प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
हा प्रस्ताव मंजूर होऊन निधी मंजूर झाला,पाठपुराव्याला यश आले, मायबाप जनतेला दिलेले आश्वासन पूर्ण झाले याचा आनंद आहे. मतदारसंघाच्या विकासासाठी यापुढेही मी निरांतरपणे कार्यरत असणार आहे.असे कोल्हे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.