लोकनेते नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न
1 min read
शिरोली दि.१२:- लोकनेते नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित शिरोली तर्फे आळे (ता.जुन्नर) ची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष वैभव काळे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. ६ सप्टेंबर २०२३ रोजी संस्थेची स्थापना झाली असून अल्पावधीतच ही संस्था नावारूपास आली. संस्थेचे एकूण २ हजार २५० सभासद संख्या असून ३ कोटी ६० हजार रुपयांचा संस्थेच्या ठेवी आहेत. संस्थेने ‘अ’ ऑडिट वर्ग मिळवला आहे. या वेळी संस्थेचे अध्यक्ष वैभव काळे बोलताना म्हणाले की, संस्था चालविणे म्हणजे ठेवी गोळा करणे आणि कर्जवाटप करणे एवढेच नसुन सहकारी तत्वानुसार सहकारी कायदे व पोटनियमानुसार चालविणे हे एक आव्हानात्मकच काम आहे.
संस्था चालवत असताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. परंतु मला माझ्या सहकारी संचालक मंडळाने व माझ्या कर्मचारी वर्गाने त्यांच्या अनुभवाच्या जोरावर हे काम अतिशय सोपे करून टाकले. त्यांच्या कार्याचा आणि निश्चयाचा अतिशय प्रामाणिकपणाने गौरवच केला पाहिजे.
आपली जुन्नर तालुका कार्यक्षेत्र असणारी संस्था सभासदांचे प्रेम, विश्वास यामुळे ३१ मार्च २०२४ अखेरपर्यंत संस्थेच्या कार्यास केवळ ६ महिनेच मिळाले आणि थोड्या कालावधीत अभिमानाने सांगता येईल की आपल्या संस्थेच्या ३ कोटी ६० हजार ठेवी गोळा केल्या असून वसुल भागभांडवल २६ लाख ११ हजार ८०० रुपये ऐवढे झाले आहे.
असेच संस्था वाढीसाठी आपले सहकार्य मिळेल अशी आशा बाळगतो. संस्थेचे सर्व सभासदांसाठी आवर्तक ठेव, लोकनेते लक्षाधिश ठेव, लोकनेते उज्वल भविष्य ठेव तसेच जेष्ठ सभासदांसाठी पेन्शन ठेव योजना देखील सुरु केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे संस्थेने टाटा इंडिकॅश एटीएम सुविधा जानेवारीत मकरसंक्रांतीच्या दिवशी सुरु करण्यात आलेली आहे.
त्याचा देखील संस्थेला ग्राहकवाढीसाठी निश्चितच फायदा होत असल्याने दिसून येत आहे.सहकारातून समृध्दीकडे या ब्रिदवाक्याला अभिप्रेत असणारी कामगिरी आपण करीत आहोत. परिसरातील एक विश्वसनीय संस्था म्हणून आगळा वेगळा विश्वास लोकांमध्ये आपल्या संस्थेविषयी आहे.
या विश्वासाला सार्थ करणे आणि आपल्या परिसरात विकासाची चेतना निर्माण करणे या उद्देशाने सर्व संचालक काम करत आहोत. सभासद व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत वार्षिक सभा संपन्न झाली. या वेळी संस्थापक अध्यक्ष वैभव काळे, उपाध्यक्ष -दिनकर काळे, सचिव अनिल गडगे, खजिनदार योगेश काळे.
संचालक विश्वास डोंगरे, अंकुश चोरे, विश्वास काळे, निलेश निलख, अर्चना उबाळे, कल्पना काळे, सुजाता चिंचवडे, तुषार डावखर उपस्थित होते. तसेच यावेळी उपस्थित कालिका माता पतसंस्थेचे चेअरमन मुरलीधर गुंजाळ, साईकृपा पतसंस्थेचे संस्थापक संचालक दत्तू भोर, समर्थ पतसंस्थेचे संचालक संतोष काळे, बिरोबा पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन देविदास भोर.
सर्व सभासद वर्ग व मान्यवर उपस्थित होते. राज्य सहकारी संघाचे अशोक केदारी यांस कडून सभासदांना मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी उपस्थित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.