जय जवान पतसंस्थेचा १५ टक्के लाभांश जाहीर; १५ लाख ३३ हजार रुपयांचा नफा
1 min readबेल्हे दि.१२:- संपूर्ण जुन्नर तालुका कार्यक्षेत्र असलेल्या बेल्हे येथील जय जवान नागरी सहकारी पतसंस्थेने सभासदांना १५% लाभांश जाहीर केला असून अहवाल सालात संस्थेला १५ लाख ३३ हजार २०८ रुपयांचा नफा झाला असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जयवंत घोडके यांनी दिली.
जय जवान नागरी सहकारी पतसंस्थेची २६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बेल्हे येथील श्री मुक्ताई माता मंदिराच्या सभागृहात जयवंत घोडके यांच्या अध्यक्षते खाली संपन्न होत असताना संस्थेच्या वाटचालीबद्दल संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुंजाळ यांनी संपूर्ण लेखाजोखा सभासदांपुढे ठेवला. असून यावेळी संपूर्ण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. संस्थेचे ७६३ सभासद असून जवळपास ८ कोटी रुपयांच्या ठेवी, सव्वा सहा कोटी रुपयांचे कर्जवाटप केले असून संस्थेची गुंतवणूक व स्वनिधी व्यवस्थित असल्याचे सांगितले, तसेच गेली तीन वर्ष संस्थेला सतत ऑडिट अ वर्ग मिळत असल्याचे सांगितले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष घोडके व संचालक मंडळाने सोने तारण कर्जासाठी ९.५% व्याजदर आकारला जाईल असे घोषित केले.वार्षिक सभा सुरू होण्यापूर्वी सभासदांना पुणे जिल्हा पतसंस्था फेडरेशनच्या वतीने सभासदांचे हक्क, कर्तव्य, जबाबदारी व बदललेल्या सहकाराचे धोरण यावर पुणे जिल्हा सहकारी बोर्डाचे अधिकारी अशोक केदारी यांनी प्रशिक्षण दिले; तसेच सूत्रसंचालन व अहवाल वाचन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुंजाळ यांनी केले. यावेळी संस्थेच्या संस्थापक अध्यक्षासह सर्व संचालक मंडळ व सभासद वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.