हिंदुस्तान फिड्स कंपनीकडून जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप
1 min read
बेल्हे दि.११:- जुन्नर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेल्हे नंबर -१ येथे हिंदुस्तान फिड्स कंपनी यांस कडून शाळेतील सर्व 230 विद्यार्थ्यांना प्रत्येकी तीन वह्या याप्रमाणे वाटप करण्यात आल्या. याप्रसंगी कंपनीचे मार्केटिंग ऑफिसर रविंद्र पवार मार्केटिंग प्रतिनिधी. गोकुळ कापकर, पूजा ट्रेडिंग कंपनीचे श्री महेश कदम, राज्य पुरस्कार प्राप्त माजी मुख्याध्यापक रामभाऊ सातपुते, स्वाती कोकणे इ मान्यवरांच्या शुभहस्ते या वह्यांचे वाटप करण्यात आले.याप्रसंगी उपसरपंच राजेंद्र पिंगट, शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष सोयल बेपारी, सदस्य दादाभाऊ मुलमुले.
प्रीतम मुंजाळ यांनी उपस्थित राहून शाळेतील मुलांना वह्या वाटप केले बद्दल मान्यवरांचा सन्मान केला. कंपनीचे मार्केटिंग ऑफिसर रविंद्र पवार यांनी मनोगत व्यक्त करीत लहान मुलांशी गप्पा गोष्टी करत कंपनीचा वह्या वाटप करण्याचा उद्देश स्पष्ट केला.
रामभाऊ सातपुते यांनी मनोगत व्यक्त करत हिंदुस्थान स्पीड कंपनीचे आभार मानले व शाळेत सुरू असलेल्या उपक्रमांचे कौतुक केले.शाळेचे माजी विद्यार्थी स्वप्निल आनंदा मुलमुले व राहुल दत्तात्रय मटाले यांची एस आर.पी. एफ. पोलीस दलात निवड झाल्याबद्दल त्यांचा सन्मान शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने वतीने करण्यात आला.
कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन उपशिक्षिका कविता सहाने, सुवर्णा गाढवे, प्रवीना नाईकवाडी योगिता जाधव, सुषमा गाडेकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक संतोष डुकरे यांनी केले. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वह्यावाटप केल्याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका मीरा बेलकर यांनी हिंदुस्तान फिड्स कंपनीच्या सर्व मान्यवरांचे आभार मानले.