मराठवाड्याला दिलासा; जायकवाडी धरण शंभर टक्के भरले; १८ दरवाज्यातून गाेदापात्रात पाण्याचा विसर्ग
1 min read
पैठण दि.१०:- जायकवाडी धरणात वाढता पाणीसाठा लक्षात घेऊन धरण प्रशासनाने आता धरणातून एकूण १८ दरवाज्याद्वारे गोदापात्रात पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. या १८ दरवाज्यातून ९ हजार ४३२ क्युसेक पाण्याचा हा विसर्ग असून प्रशासनाकडून गोदाकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
जायकवाडी धरण शंभर टक्के भरुन वाहिल्याने मराठवाड्याला दिलासा मिळाला आहे. पावसाळा सुरु झाल्यानंतर जून, जुलै महिन्यात पावसाने दडी मारली. मात्र, ऑगस्ट महिन्यात पाऊस सक्रिय झाला व महिनाभरात जायकवाडी भरले. त्यामुळे ऑगस्ट महिना धरण पूर्ण क्षमतेने भरण्यास लाभदायक ठरला आहे.