तहसिलदार सुनिल शेळके व गटविकास अधिकारी सचिन सुर्यवंशी यांच्या आश्वासन नंतर उंचखडक चे उपोषण तिसऱ्या दिवशी सोडले

1 min read

उंचखडक दि.३०:- उंचखडक ते आबाटेक रस्त्यातील अडथळा दुर करणे, आबाटेक वस्तीवरील पिण्याच्या पाण्याची तीन ते चार वर्षे सोय नसणे,१५ व्या वित्त आयोग प्राप्त निधी खर्च न करणे या मागण्यांसाठी सुनिल मारूती कणसे व संपुर्ण आबाटेक वस्तीवरील पुरूष व महिला ग्रामपंचायतीच्या कार्यालयासमोर गेल्या तीन दिवसांपासून उपोषणास बसले होते.

या उपोषणाची प्रशासणाने दखल घेत तहसिलदार सुनिल शेळके, गटविकास अधिकारी सचिन सुर्यवंशी यांनी भेट देत समस्या समजुन घेतल्या यामध्ये विशेष करून गेल्या विस ते पंचवीस वर्षांपासुन प्रलंबित असणा-या आबाटेक ते उंचखडक या रस्त्याचे काम रखडले होते.

हा प्रश्न सोडवण्यात तालुक्याचे तहसिलदार शेळके यांना यश आले आहे. तहसिलदार शेळके यांनी स्वत: या ठिकाणी वेळ देऊन अनेक वर्षांपासुन प्रलंबित असलेला रस्त्याच्या प्रश्न सोडवल्या बद्दल येथील ग्रामस्थांनी त्याचा सत्कार केला.

तसेच गटविकास अधिकारी सचिन सुर्यवंशी यांनी उपोषण ग्रामस्थांच्या ज्या मागण्या आहेत. त्या लवकरात लवकर सोडविण्यात येतील असे सांगितले. तीन दिवस चाललेल्या या उपोषणास तालुक्याचे आमदार अतुल बेनके, जि.प.चे माजी उपाध्यक्ष शरद लेंडे, माजी सभापती दिपक औटी, राजुरी गावचे उपसरपंच माऊली शेळके, वल्लभ शेळके यांनी भेट दिली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे