शिवरायांच्या पायावर डोकं ठेवून माफी मागतो, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा माफीनामा

1 min read

मुंबई दि.३०:- मागच्या आठवड्यात सिंधुदुर्गामध्ये जे घडलं, माझ्यासाठी आणि माझ्या सहकाऱ्यांनी शिवाजी महाराज फक्त नाव नाही तर आमच्यासाठी शिवाजी महाराज हे आराध्य दैवत आहे. मी आज नमन करून, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पायावर डोकं ठेवून माफी मागतो, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीरपणे माफी मागितली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदींच्या हस्ते पालघरमधील वाढवण बंदराच्या भूमिपूजनाचा सोहळा पार पडला. यावेळी बोलत असताना पंतप्रधान मोदींनी राजकोट किल्ल्याबाहेर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला. या प्रकरणी पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींनी भाष्य केलंय.

‘आज या कार्यक्रमाची चर्चा करत असताना, मी आपल्या भावना व्यक्त करू इच्छितो, माझी पंतप्रधान पदाच्या उमेदवारी निवड झाली होती, त्यावेळी मी रायगडावर येऊन शिवाजी महाराज यांच्या समाधीजवळ येऊन बसलो होतो. मागच्या आठवड्यात सिंधुदुर्गामध्ये जे घडलं, माझ्यासाठी आणि माझ्या सहकाऱ्यांनी शिवाजी महाराज फक्त नाव नाही तर आमच्यासाठी शिवाजी महाराज हे आराध्य दैवत आहे. मी आज नमन करून, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पायावर डोकं ठेवून माफी मागतो.

‘आमचे संस्कार वेगळे आहे. आम्ही ते लोक नाही, भारताचे सुपुत्र वीर सावरकर यांना शिवीगाळ करत असतात. त्यांच्यावर टीका करत असतात. सावरकर यांच्यावर नको त्या शब्दांत टीका करतात, पण माफी मागत नाही. कोर्टात जातात. तरी त्यांना पश्चाताप होत नाही’ असं म्हणत मोदींनी विरोधकांवर टीका केली.

‘पण मी आज शिवाजी महाराज यांच्या भूमीमध्ये आलो आहे, आणि शिवाजी महाराज यांच्या पायावर डोकं ठेवून माफी मागतो, एवढंच नाहीतर जे जे लोक शिवाजी महाराज यांना आपलं आराध्य दैवत्य मानत आहे. त्यांच्या भावना दुखावल्या आहे, अशा आराध्य दैवत्याची पूजा करणाऱ्या तमाम लोकांची मान खाली घालून माफी मागतोय, आराध्य दैवतांपेक्षा कुणीही मोठं नाही, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे