सुप्रसिद्ध कर्करोगतज्ञ डॉ.अमोल डुंबरे यांना मिळवला दुसऱ्यांदा आयर्नमॅन किताब

1 min read

आळेफाटा दि.२४:- इटली येथे २१ सप्टेंबर २०२४ रोजी ‘आयर्न मॅन ट्रायोथलॉन’ स्पर्धा पार पडली. या स्पर्धेमध्ये जुन्नर तालुक्यातील प्रसिद्ध कॅन्सर तज्ञ डॉ.अमोल डुंबरे यांनी हा किताब पटकवला आहे.

ही जगातील एक दिवसीय स्पर्धामधील अतिशय खडतर स्पर्धा असते. या स्पर्धेमध्ये जगभरातली विविध देशातील ३००० स्पर्धकांनी भाग घेतला होता.

हे स्पर्धा अतिशय खडतर असून यात स्पर्धकाचा शारीरिक आणि मानसिक क्षमतेचा कस लागतो.यात ३.८ किलोमीटर पोहणे, १८० किलोमीटर सायकल चालवणे व ४२ किलोमीटर पळणे हे सलग न थांबता करायचे असते.तसेच हे सर्वे १६ तासाच्या आत पूर्ण करायचे असते.

डॉ. अमोल डुंबरे यांनी हे आव्हान १५ तास १३ मिनिटामध्ये पूर्ण केले. यासाठी मागील सहा महिन्यापासून डॉ. अमोल डुंबरे यांनी कठोर परिश्रम व मेहनत केली होती. हॉस्पिटल मधील व्याप संभाळून खडतर स्पर्धेची तयारी करणे व आयर्नमॅन किताब मिळवणे निशीतच कौतुकास्पद आहे.

या आधी शनिवार दि. ५ मार्च २०२२ रोजी दुबई येथे पार पडलेल्या ‘आयर्न मॅन ७०.३’ या ट्रायथलॉन स्पर्धेमध्ये १२५ देशांचे २५०० हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. या मध्ये ही ‘आयर्नमॅन’ ही स्पर्धा पूर्ण करणारे डॉ.अमोल डुंबरे हे पुणे जिल्ह्यातील पहिले कॅन्सर तज्ञ व जुन्नर तालुक्यातील पहिलेच व्यक्ती ठरले होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे