पोलीस उपनिरीक्षकाचा ऑनड्युटी मृत्यू
1 min read
Oplus_131072
राजगुरूनगर, दि.२३:- राजगुरूनगर पोलीस ठाण्यातील ३५ वर्षीय पोलीस उपनिरीक्षक संदीप गोरक्ष पर्वते यांना ड्युटी बजावत असताना हृदयविकाराच्या तीव्र झटका आला त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. २२) सकाळी दहासाडेदहाच्या सुमारास घडली.
पोलीस उपनिरिक्षक संदीप गोरक्ष पर्वते हे अकलूज (जि. सोलापूर) चे रहिवासी होते. मागील महिन्यापूर्वी ते खेड पोलीस ठाण्यात बदली होऊन आले होते. रविवारी सकाळी पोलीस ठाण्यात आल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला.
पोलीस कर्मचारी अर्जुन गोडसे व सहकाऱ्यांनी त्यांना साळुंखे येथील हॉस्पिटलमध्ये भरती केले. पुढील उपचारासाठी चाकण येथील रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.
त्यांनी जुन्नर तालुक्यातील ही आपली सेवा चोख बजावली होती. तुमच्या मृत्यूने जुन्नर,आंबेगाव, खेड तालुक्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. डॅशिंग पोलीस अधिकारी अशी त्यांची ओळख होती.