नवरात्रोत्सवानिमित्त रोटरी क्लब भोसरी, शिवनेरी हाॅस्पिटल व आनंद हाॅस्पिटल तर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबीर

1 min read

भोसरी दि.१३:- रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरी, शिवनेरी हाॅस्पिटल व आनंद मल्टिस्पेशालिटी हाॅस्पिटल भोसरी तसेच टोरंट फार्मा यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्रौत्सवाचे औचित्य साधून नवदुर्गांच्या आरोग्य विषयक हिमोग्लोबिन, हाडांची ठिसूळता व आहारविषयक मार्गदर्शन शिबीर शिवनेरी हाॅस्पिटल भोसरी येथे आयोजित करण्यात आले होते. या शिबीराचा १३० रुग्णांनी लाभ घेतला.

यावेळी रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरीचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर विधाते,क्लब ट्रेनर विजय गोरडे यांच्या हस्ते या शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ व जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या शिबीराचे आयोजनाबद्दल आयोजक डॉ.योगेश गाडेकर व डॉ.संतोष मोरे यांनी माहिती दिली. रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरीचे अध्यक्ष दिपक सोनवणे यांनी रोटरीचे आरोग्य क्षेत्रातील कार्य व सामाजिक जाणीवेतून दरवर्षी होत असलेल्या उपक्रमांबद्दल माहिती देत नवरात्रोत्सवात आरोग्याचा जागर केल्याबद्दल रोटरी क्लब भोसरीच्या मेडिकल टीमचे अभिनंदन केले. माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर विधाते यांनी समाजात गरजूंसाठी रोटरीचे कार्य नेहमी प्रेरणादायी राहिले असल्याचे सांगून रोटरी क्लब या आंतरराष्ट्रीय सामाजिक संस्थेचे आरोग्य क्षेत्रातील कार्यामध्ये रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरी नेहमीच अग्रेसर असून यामध्ये शिवनेरी हाॅस्पिटल व आनंद मल्टिस्पेशालिटी हाॅस्पिटल यांचा सहभाग कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन केले.

अशोक गाडेकर यांना संत सावता प्रतिष्ठानच्या वतीने आदर्श पालक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच टोरंट फार्माचे प्रतिनिधी कृष्णा टमके, राहुल पोदडे यांचा तसेच शिवनेरी हाॅस्पिटल स्टाफ नर्स व आनंद मल्टिस्पेशालिटी हाॅस्पिटल स्टाफ यांचा डाॅ.योगेश गाडेकर, डाॅ.पुजा गाडेकर व डॉ.संतोष मोरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.या उपक्रमात अशोक गाडेकर,अॅड.संदीप गाडेकर, विकास नवले रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरीचे पर्यावरण संचालक अण्णासाहेब मटाले, खजिनदार केशव काळदाते,क्लब ट्रेनर विजय गोरडे,गव्हर्मेंट लायझनिंग डायरेक्टर गणेश काशिद, लिटर्सी डायरेक्टर प्रा.सचिन पवार,सी.एस.आर.डायरेक्टर अॅन सौ.अंजली कोल्हे यांच्या सह तपासणी शिबीरात तपासणीसाठी महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या.केशव काळदाते यांनी सुत्रसंचलन केले तर प्रा.सचिन पवार यांनी आभार मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे