जुन्नरच्या पूर्व भागात अवकाळी पावसाचा तडाखा; आळेफाटा येथे गारपीट

1 min read

बेल्हे दि.४:- जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात गेल्या चार दिवसापासून ढगाळ वातावरण असून गुरुवार दि.३ रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास आळेफाटा, राजुरी, बेल्हे, उंचखडक,परिसरात पावसाने हजेरी लावली वादळी वाऱ्यासह काही भागांत जोरदार पाऊस झाला. आळेफाटा शहरात अल्प प्रमाणात गारपीट झाली.गारांच्या तडाख्यामुळे या भागातील काढणीस आलेल्या गहू, कांदा, डाळिंब, कलिंगड, भाजीपाला पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्यामुळे शेतकरी वर्गाला मोठा आर्थिक फटका बसला आहे.निमगाव सावा परिसरात जोरदार वादळी वारा वाहत होता. जोरदार वाऱ्यामुळे आंब्यालाही तडाखा बसला आहे बऱ्याच ठिकाणच्या आंब्याच्या कैऱ्या पडलेल्या आहेत. कांदा काढणी चालू असल्यामुळे शेतकऱ्यांची अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे धांदल उडाली. तीन दिवसापासून रात्रीच्या वेळी विजांचा कडकडाट या परिसरात दिसत होता. वातावरण बदलामुळे नागरिकांना उकड्यापासून दिलासा मात्र मिळाला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे