बाभळेश्वर – कडुस (मुंबई ) विद्युत वाहिनीचे टावर न उभारता अधिकारी परतले;आमदार शरद सोनवणे यांच्या मध्यस्थीला यश

1 min read

आळेफाटा दि.४:- बाभळेश्वर – कडुस (मुंबई ) विद्युत वाहिनीच्या ४०० के.व्ही. अतिउच्च वाहिणीच्या भूसंपादनास आळे येथील शेतकऱ्यांनी विरोध केला असुन ही वाहिणीचे काम करण्यासाठी गुरूवार दि.३ रोजी पोलिस बंदोबस्तात कामास सुरुवात करणार होते परंतु आमदार शरद सोनवणे यांनी शेतकऱ्यांची बाजु मांडत या कामाला तातपुरती स्थगीती आणली आहे.बाभळेश्वर – कडुस(मुंबई ) विद्युत वाहिनीच्या ४०० के.व्ही.अति.उच्च वाहिणी आळे गावातुन जात असुन यासाठी ज्या शेतक-यांच्या शेतात टॉवर उभारणार आहे त्यास येथील शेतक-यांंनी कडकडुन विरोध केला असुन. या वाहिणीचे काम करण्यासाठी संबंधित कंपनिचे अधिकारी व कर्मचारी हे पोलिस बंदोबस्तात काम करण्यासाठी गुरवारी येत असल्याची माहिती शेतक-यांना मिळाल्यानंतर जयराम भुजबळ, संजय गुंजाळ, ज्ञानेश्वर कु-हाडे, संजय पाटील कु-हाडे, ज्ञानेश्वर शिंदे, नितीन कु-हाडे, जिजाबाई कु-हाडे,गणेश कु-हाडे, उत्तम भुजबळ, सुजित कु-हाडे, नामदेव कोकणे, पोपट भुजबळ, बाळासाहेब भुजबळ, गेणभाऊ हुलवळे, प्रकाश हुलवळे, संदिप हुलवळे, कारभारी डावखर, गणेश शिंदे, सुभाष कु-हाडे, बबन कु-हाडे, तान्हाजी कु-हाडे, सम्राट कु-हाडे, विलास तितर, तुषार कु-हाडे, बबन शिदे, प्रविण भुजबळ, रामदास भुजबळ, शिवा कु-हाडे, भिमाजी शिंदेया शेतकऱ्यांनी बुधवार दि.२ रोजी आमदार सोनवणे यांची भेट घेऊन आपली समस्या मांडली त्यानंतर आमदार सोनवणे यांनी महापारेषण चे अधिकारी तहसीलदार डॉ.सुनिल शेळके, उपविभागीय पोलिस अधिकारी रविंद्र चौधर आळेफाटा पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक दिनेश तायडे यांनी प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात जाऊन पहाणी करत आमदार सोनवणे यांनी शेतकऱ्यांची बाजू अधिका-यांसमोर मांडून व समजावून सांगितल्याने या कामाला तातपुरती स्थगीती आणली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे