जयहिंद अभियांत्रिकी महाविद्यालयाला नॅक कडून “अ” दर्जा
1 min read
कुरण दि.१८:- जुन्नर तालुक्यातील कुरण येथील जयहिंद शैक्षणिक संकुलाच्या जयहिंद अभियांत्रिकी महाविद्यालयाला नॅक कडून ‘अ’ दर्जा प्राप्त झाला असल्याची माहिती जयहिंद शैक्षणिक संकुलाचे सचिव विजय गुंजाळ यांनी दिली. राज्यातील सर्व महाविद्यालयांच्या शैक्षणिक व भौतिक सुविधांचे अवलोकन करून. त्यांचा दर्जा ठरविणारी युजीसी ने नेमलेली नॅशनल असेसमेंट ऍन्ड ऍक्रिडीटेशन (NAAC) हि भारत सरकारची स्वायत्त संस्था आहे. या संस्थेमार्फत देशातील सर्व महाविद्यालयांकडून माहिती मागविण्यात येते व त्याचे अवलोकन करून तसेच शैक्षणिक क्षेत्रातील तज्ञांकडून प्रत्यक्ष पाहणी करून उपलब्ध सुविधांची तपासणी केली जाते.
ऑनलाईन पध्दतीने झालेले मुल्यांकन व प्रत्यक्ष पाहणी करून तज्ञांनी केलेले मुल्यमापन यांचा एकत्रित विचार करून समितीकडून दर्जा ठरविण्यात येतो. जयहिंद अभियांत्रिकी महाविद्यालयाची नुकतीच तज्ञांकडून तपासणी करण्यात आली ज्यामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थी, माजी विद्यार्थी, पालक यांची मते जाणून घेण्यात आली.
तसेच महाविद्यालयातील उपलब्ध उपकरणे, मशीनरी, बस सुविधा, हॉस्टेल सुविधा, शैक्षणिक मुल्यमापन, महाविद्यालयात राबविण्यात येणारे समाजोपयोगी उपक्रम यासंबंधी माहिती या समितीने घेतली. दर्जेदार शिक्षण व सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संस्था नेहमीच कटिबध्द आहे.
विद्यार्थी हाच संस्थेचा केंद्रबिंदू आहे. यापुढेही संस्था विद्यार्थीभिमुख कार्य करत राहिल. अ दर्जा मिळाल्याने शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून यापुढील काळात प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात येतील व संशोधनाला पुरक वातावरण कसे निर्माण करता येइल याचा आम्ही निश्चितपणे विचार करू असे मत संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र गुंजाळ यांनी व्यक्त केले.
तसेच अ दर्जा प्राप्त झाल्याबद्दल सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, संस्था पदाधिकारी यांचे अभिनंदन केले. या सर्व वाटचालीमध्ये साथ देऊन वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे संस्थेच्या वतीने संचालिका डॉ. शुभांगी गुंजाळ यांनी आभार मानले.