बेल्हे जिल्हा परिषद शाळेतील ३०० विद्यार्थांची मोफत दंतचिकित्सा

1 min read

बेल्हे दि.१६:- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेल्हे (ता.जुन्नर) नंबर-१ शाळेत मोफत दंत आरोग्य चिकित्सा शिबिर व मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेल्हे नंबर १, जि प शाळा बेल्हे उर्दू, जि प शाळा ढगेमळा व जि प शाळा इंदिरानगर शाळेतील ३०० विद्यार्थ्यांची दंतचिकित्सा करण्यात आली. यासाठी डॉ. कुंडलिक आव्हाड व डॉ. पूजा आव्हाड, डॉ. रविकिरण ढोले, डॉ.वैभव साठे यांनी दंतचिकित्सा करून शाळेतील सर्व मुलांना मार्गदर्शन केले.याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्या मंदाकिनी नायकोडी, कमलताई घोडे, पल्लवीताई भंडारी, ढगीमळा शाळेचे अध्यक्ष संतोष भोसले. अजय गुंजाळ व्यवस्थापक मांडवी पतसंस्था इ मान्यवर उपस्थित होते. शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य दादाभाऊ मुलमुले, संतोष पाबळे, शेखर पिंगट, शिक्षण तज्ञ विलास पिंगट, प्रीतम मुंजाळ यांनी उपस्थित राहून मान्यवरांचा सन्मान केला.

त्याचबरोबर शाळेमध्ये सुरू असलेल्या मिशन बर्थडे उपक्रमांतर्गत आर्वीका कुंडलिक आव्हाड हिच्या वाढदिवसानिमित्त शाळेला चार फॅन भेट देण्यात आले. याबद्दल देणगीदारांचा सन्मान उपशिक्षक हरिदास घोडे यांनी केला. पालक शिला पिंगट, तौमिजा पठाण, तब्बू पठाण यांनी उपस्थित राहून शिबिरास सहकार्य केले.कार्यक्रमानंतर सर्व मुलांसाठी पावभाजी व लाडूचा मेनू दानशूर व्यक्तिमत्व माजी अध्यक्ष नारायण पवार , हरकू पिंगट, सुनिल घोडे, तुषार बिचारे व दिनेश औटी यांनी दिले याबद्दल त्यांचे आभार शाळेचे मुख्याध्यापिका मीरा बेलकर व सर्व शिक्षक वृंद यांनी मानले. कार्यक्रमाचे नियोजन उपशिक्षक कविता सहाणे. सुवर्णा गाढवे, प्रवीण नायकोडी, योगिता जाधव, अंजना चौरे, सुषमा गाडेकर , पुष्पा साके, गणेश बिडवई, तहसीन शेख यांनी केले सूत्रसंचालन संतोष डुकरे यांनी केले तर आभार महादू कुरकुटे यांनी मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे