आमदार अतुल बेनके यांच्या वाढदिवसानिमित्त बेल्हे जिल्हा परिषद शाळेतील सर्व मुलांना वह्या वाटप
1 min read
बेल्हे दि.१५:- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेल्हे नं -१ शाळेत जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेतील सर्व 230 विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन प्रमाणे वह्या वाटप करण्यात आले.याप्रसंगी माजी सरपंच पाराजी बोरचटे, उपसरपंच राजू पिंगट, तालुका युवा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अतुल भांबेरे, माजी सरपंच गोट्याभाऊ वाघ. ग्रामपंचायत सदस्य नाजिम पापा बेपारी, समीर गायकवाड, कैलास आरोटे, अप्पा मुलमुले, शेतकरी नेते डॉ. खोमणे, योगेश डोळस इ. मान्यवरांच्या शुभहस्ते वह्यांचे वाटप करण्यात आले. तसेच शाळेला लॅमिनेशन मशीन दिल्याबद्दल ग्रामपंचायत सदस्य नाजीम पापा बेपारी यांचा सन्मान याप्रसंगी शाळेच्या वतीने करण्यात आला.
शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष सोईल बेपारी, सदस्य दादाभाऊ मुलमुले, हरिदास घोडे यांनी याप्रसंगी मान्यवरांचा सन्मान केला व शाळेतील मुलांना वह्या वाटप केल्याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका मीरा बेलकर यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले. शाळेतील सर्व शिक्षकांचे यासाठी सहकार्य लाभले.