विद्यानिकेतनमध्ये इंटरनॅशनल अकॅडमीत रंगली विद्यार्थ्यांची वाद-विवाद प्रतियोगिता

1 min read

साकोरी दि.१४ – जुन्नर तालुक्यातील साकोरी येथील विद्यानिकेतन इंटरनॅशनल अकॅडमी येथे गणेश उत्सव निमित्त वादविवाद स्पर्धा ही मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून,

शाळेचे संस्थापक पी.एम. साळवे व विद्यानिकेतन इंटरनॅशनल अकॅडमीच्या मुख्याध्यापिका रुपाली पवार -भालेराव लाभल्या होत्या. प्रमुख पाहुण्यांनी प्रतिमा पूजन करून मुलांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

स्पर्धेमध्ये इयत्ता ६ वी ते इयत्ता १०वी पर्यंत च्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा विविध हाऊस प्रमाणे घेण्यात आली. जसे वायु, अग्नी, जल व पृथ्वी. ही स्पर्धा चार फेऱ्यांमध्ये घेण्यात आली. पर्यटनाचा पर्यावरणावर परिणाम, पैसा सर्वकाही आहे , भारतीय संस्कृती व पाश्चिमात्य संस्कृती इत्यादी विषय या स्पर्धेसाठी होते.

या स्पर्धेने मुलांच्या कलेला वाव मिळाला, विचारांची देवाण-घेवाण, मुलांचा सभा धीटपणा वाढण्यास मदत होते अशी माहिती प्राचार्या रुपाली पवार – भालेराव यांनी दिली. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून यशवंत दाभाडे, शरद गोरडे, विशाल जाधव यांची निवड करण्यात आली होती.

परीक्षकांनी सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केले. स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे मानकरी पृथ्वी हाऊस ठरले तर द्वितीय क्रमांकाचे मानकरी अग्नी ठरले तर तृतीय क्रमांकाचे मानकरी जल ठरले तसेच चौथ्या क्रमांकाचे मानकरी वायू ठरले.

या पूर्ण स्पर्धेचे नियोजन सीसीए डिपार्टमेंटने केले होते. यावेळेस या कार्यक्रमात सूत्रसंचालन श्रद्धा वाघ यांनी केले तसेच प्रतिभा जाधव, दिपाली ढवळे, अपेक्षा पोळ यांचे ही अनमोल सहकार्य लाभले. विनोद उघडे यांनी फलक लेखन केले.

तसेच मुलांचं मनोबल वाढवण्यासाठी गणेश कर्डिले व गणेश शिंदे यांनीही उपस्थिती दाखवली व शेवटी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस वितरण झाले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे