दिलीप वळसे पाटील महाविद्यालयातील बाप्पाला उत्साहात निरोप

1 min read

निमगाव सावा दि.११:-:श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित दिलीप वळसे पाटील कला, वाणिज्यव विज्ञान महाविद्यालय व श्री पांडुरंग कनिष्ठ महाविद्यालयामध्ये आज पाचव्या दिवशी गणरायाला निरोप देण्यात आला. पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार यांच्या शुभहस्ते आरती घेण्यात आली. तदनंतर महाविद्यालयीन आजी-माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी, सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी, संस्थेचे सर्व पदाधिकारी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि डीजेच्या निनादामध्ये महाविद्यालयापासून तर कुकडी नदी तिरापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देताना डीजेच्या तालावरती ठेका धरला. निमगाव सावाचे डॉक्टर सतीश बोरा यांच्या शुभहस्ते आरती घेऊन बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. यावेळी “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर” या अशा घोषणांनी कुकडी नदी तीर दुमदुमून गेला.

गेले पाच दिवस बाप्पांची सेवा करताना अनेक थोरामोठ्यांचे योगदान लाभले. संस्थेचे अध्यक्ष संदिपान पवार, सचिव परेश घोडे तसेच सर्व संचालकांचे विशेष सहकार्य मिळाले. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.प्रल्हाद शिंदे यांनी बाप्पाच्या पूजेनंतर सर्वांसाठी महाप्रसादाचे सौजन्य दिले. सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.नीलम गायकवाड आणि सर्व प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली गणेश उत्सव अतिशय आनंदामध्ये साजरा करण्यात आला. यावर्षी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी यांनी बाप्पांची मूर्ती सौजन्य म्हणून दिली. त्यांचेही विशेष योगदान लाभले. वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी अतिशय सुरेख नियोजन करून उत्सव संपन्न केल्याचे प्रा. अनिल पडवळ यांनी सांगितले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे