सह्याद्री व्हॅली इंजीनियरिंग कॉलेजमध्ये शिक्षकांचा सन्मान
1 min readराजुरी दि.७:- भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी हा दिवस साजरा केला जातो. हा दिवस विद्यार्थ्यांचे मन आणि भविष्य घडवण्यात शिक्षकांच्या योगदानाचा सन्मान आणि कौतुक करण्यासाठी समर्पित आहे. महाराष्ट्रात, विद्यार्थी शिक्षकांना भेटवस्तू आणि फुले सादर करणे, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून त्यांच्या शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे यासारख्या विविध उपक्रमांसह शिक्षक दिन साजरा केला. तद्प्रसंगी सह्याद्री व्हॅली अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्रत्येक शिक्षकाला गिफ्ट व पुष्प देऊन सर्व शिक्षकांचा सन्मान केला. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित महाविद्यालयाचे संचालक सचिन चव्हाण, प्राचार्य पी बलराम व महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वमोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते.