पुणे- नाशिक औद्योगिक द्रतगती महामार्ग कायमस्वरूपी रद्द; निमगाव सावा शेतकरी पुन्हा आक्रमक

1 min read

निमगाव सावा दि.१२:- पुणे- नाशिक औद्योगिक द्रतगती महामार्ग कायमस्वरूपी रद्द करून राज्य सरकारने तशी अधिसूचना काढावी महामार्ग प्रकल्पांना केंद्राचा भूसंपादनाचा सन २०१३ चा कायदा लागू करावा आधी विविध मागण्यांसाठी दिनांक २७ ऑगस्ट २०२४ रोजी जुन्नर तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांनी साखळी उपोषण केले होते.

आंदोलनात करिता विविध पदाधिकारी व नेतेमंडळी महामार्ग रद्द करण्यासाठी त्वरित कारवाई करण्याचे आश्वासन दिले. परंतु पंधरा दिवस उलटूनही अद्याप शासनाने कोणतेही ठोस पाऊल न उचलल्याने निमगाव सावा (ता.जुन्नर) येथील ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. हा प्रश्न 19/9/2024 पर्यंत निकाली काढावा;

अन्यथा प्रांनांतीक उपोषण, रस्ता रोको, सर्व शासकीय कार्यालय आणि मंत्री, आमदार, खासदार यांच्या कार्यालय व घरापुढे धरणे उपोषण, कोणत्याही राजकीय नेत्यांना गाव

प्रवेश बंदी व प्रसंगी मतदान बहिष्कार अश्या पद्धतीने आंदोलन तीव्र करणार असल्याची माहिती निमगाव सावा येथील सरपंच किशोर घोडे, मा.उपसरपंच नजीरभाई चौगुले, प्रतिक जावळे,

गणपत गाडगे (मा ग्रा.सदस्य), सुनील जावळे (सदस्य ग्रा. प.निमगाव सावा), दादामिया पटेल (अध्यक्ष मुस्लीम जमात) अशोक गाडगे, अमोल जावळे, रिजवान पटेल, अनिस पठाण, सागर बोऱ्हाडे, शुभाष जावळे व इतर बाधित शेतकऱ्यांनी दिली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे