माजी खासदार आढळराव पाटील यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा
1 min readपुणे, दि.६:- शिरूर लोकसभेचे माजी खासदार तसेच पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यमंत्री पदाचा दर्जा देण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय गुरुवारी (दि.५) महाराष्ट्र शासनाच्या गृहनिर्माण विभागाकडून पारित करण्यात आला आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी आढळराव पाटील यांची पुणे म्हाडाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरताना पुणे म्हाडाचे अध्यक्ष पद हे शासकीय लाभाचे पद असल्याने त्यांनी राजीनामा दिला होता. यानंतर २३ जुलै रोजी आढळराव पाटील यांची पुर्ननियुक्ती करण्यात आली. आता हे पद राज्यमंत्री दर्जाचे असल्याने त्यांना या पदाच्या सर्व सेवा सुविधा मिळणार आहेत.